आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीलंकेतील राजकीय संकट मंगळवारी आणखी वाढले. राष्ट्रपती गोटाबाय राजपक्षे यांच्या सरकारमधील घटक पक्षांच्या ४१ खासदारांनी राजीनामे दिले आहेत. २२५ सदस्यीय संसदेत राजपक्षे यांच्याकडे बहुमतासाठी आवश्यक ११३ खासदारांचा पाठिंबा राहिलेला नाही. राष्ट्रपती गोटाबाय राजपक्षे, पंतप्रधान महिंदा राजपक्षे व सरकारमध्ये सामील राजपक्षे गटाच्या इतर पाच जणांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी मोर्चा उघडला असून ते रस्त्यावर उतरले आहेत. मंगळवारी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शक मोठ्या संख्येने जमले होते. विद्यार्थ्यांना सर्व स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. श्रीलंकेचे माजी क्रिकेट स्टार सनथ जयसूर्या, कुमार संगाकाराही आंदोलनात सहभागी झाले. श्रीलंकेच्या बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीला राजपक्षे गट जबाबदार असल्याचे निदर्शकांचे म्हणणे आहे.
निदर्शनांसाठी परदेशातून मायदेशी दाखल
सरकारविरोधी निदर्शनात सहभागी होण्यासाठी परदेशात राहणारे विद्यार्थी मायदेशी परतू लागले आहेत. राजपक्षे गटामुळे परदेशातील श्रीलंकेची प्रतिमा मलिन होते, असा त्यांचा आरोप आहे. सरकारला हटवूनच परतणार असल्याचा त्यांचा संकल्प आहे.
नवीन अर्थमंत्र्यांचा राजीनामा,तीन देशांतील दूतावास बंद
राष्ट्रपती गोटाबाय यांनी नियुक्त केलेले अर्थमंत्री अली साबरी यांनी केवळ चोवीस तासांत पदाचा राजीनामा दिला. देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. श्रीलंकेवर चीनचे ५० हजार कोटींचे कर्ज आहे. त्यातच श्रीलंकेने नॉर्वे, इराक, ऑस्ट्रेलियातील राजदूत कार्यालये बंद करण्याचे आदेश दिले.
दीड लाखावर परदेशी पर्यटकांनी श्रीलंका सोडली दीड लाखावर परदेशी पर्यटक श्रीलंका सोडून निघून जात आहेत. कोरोनाकाळानंतर पहिल्यांदाच परदेशी पर्यटक श्रीलंकेत येत होते. यंदा पाच लाखांहून जास्त पर्यटक येतील, अशी अपेक्षा होती. श्रीलंकेच्या जीडीपीमध्ये पर्यटन क्षेत्राचा १२ टक्के वाटा असतो. यंदा हंगामात सव्वा लाख पर्यटकांनी देश साेडला.
भारताच्या शेजारी राष्ट्रांवर चीनचे ८ लाख कोटी रुपयांचे कर्ज
पाकिस्तान: चीनचे तीन लाख कोटींचे कर्ज, राजकीय स्थिती : अस्थिरता. इम्रान सरकारविरोधात खटला प्रलंबित.
नेपाळ : चीनचे १ लाख ३५ हजार कोटींचे कर्ज. राजकीय स्थिती : कम्युनिस्ट पक्षांत रस्सीखेच, कधीही अस्थैर्याचे संकट.
मालदीव : चीनेचे ११ हजार कोटींचे कर्ज. राजकीय स्थिती : मोहंमद सोलिह सरकारविरोधात भारतविरोधी पक्षांचे आंदोलन.
बांगलादेश : चीनचे ९० हजार कोटींचे कर्ज. राजकीय स्थिती : वाढती महागाई, हसीना सरकारविरोधात निदर्शने सुरू.
अफगाणिस्तान : अफगाणिस्तान : चीनचे १ हजार ८८ हजार कोटी कर्ज. स्थिती : तालिबान सरकार सत्तेवर, जगभरात मान्यता नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.