आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:विद्यार्थ्यांचे शुभेच्छापत्र वृद्धांसाठी जगण्याची नवी उमेद!

वँकूव्हर (कॅनडा)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कॅनडात मुलांसाठी तयार केलेला सोशल इमोशनल लर्निंग प्रोजेक्ट जिल्ह्यात लागू

कॅनडाच्या मॅपल रिज भागातील कनक क्रीक एलिमेंट्री स्कूलने कोरोनाच्या प्रादुर्भावापूर्वी शालेय मुलांना एक प्रकल्प दिला होता. त्याची संकल्पना ‘कार्ड ऑफ होप’. हे प्रकल्प कार्य मुलांना पालकांसोबत मिळून पूर्ण करायचे होते. त्यातून सकारात्मकता, प्रेरणा, नवोन्मेष जागृत करणारे मॉडेल अपेक्षित होते. परंतु, कोरोना संकटामुळे लॉकडाऊन झाले आणि मुलांना घरातच बसावे लागले. या परिस्थितीत ३० वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असलेल्या डॉन फ्लॅनागन यांनी एक शक्कल लढवली. मुलांनी तयार केलेले प्रकल्प कार्य व त्याचा संदेश केअर होम्समधील वृद्धांपर्यंत पोहोचवू, असे त्यांना वाटले. त्यांनी मुलांना व पालकांनी प्रकल्प कार्य पूर्ण करण्याची सूचना केली. केअर होम्समध्ये अनेक वृद्ध विलगीकरणाखाली आहेत. ते दोन महिन्यांपासून कुटुंबापासून दूर आहेत. मुलांनी तयार केलेले कार्ड त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प फ्लॅनागन यांनी केला. त्यातून वृद्धांना काहीसा दिलासा मिळावा, असा त्यांचा उद्देश आहे. 

कार्ड््समध्ये मुलांनी काही संदेश दिले. ‘बळकट व्हा. तुम्ही एकटे नाहीत, एक दिवस सर्वकाही ठीक होईल. आपण परा‌भव मानू नये.’ कार्ड ऑफ होप प्रकल्प आम्ही मुले व त्यांच्या कुटुंबासाठी तयार केला होता. हळूहळू हा परिवार खूप विस्तारला. आता तो संपूर्ण जिल्ह्यात आहे. या प्रकल्पाने महामारीच्या काळात आशा निर्माण करण्याचे काम केले आहे. संसर्गाची सर्वाधिक भीती असलेल्या वृद्धांना या प्रकल्पामुळे सर्वाधिक दिलासा मिळाला आहे, असे फ्लॅनागन यांनी सांगितले. आता हे कार्ड्स कोरोनाशी लढणाऱ्या लोकांविषयी सन्मान दर्शवण्यासाठी डॉक्टर, नर्स व हॉस्पिटल स्टाफशिवाय इतर कर्मचाऱ्यांना देखील दिले जात आहेत. अनेक रुग्णालये, केअर होम्सने मुलांच्या या संदेशांना भिंतीवर लावले आहे. त्यास स्लाइड शोद्वारे टीव्हीवर दाखवले जात आहे. अनेक संघटनांनी या आर्टवर्कला आपले अभियान किंवा संकेतस्थळावर वापराची परवानगी देखील मागितली आहे. त्यातून ते देखील वृद्ध कुटुंब, इतर लोकांसाठी आशा व प्रेरणेचा संदेश पोहोचवू शकतील. 

३ वर्षांच्या मुलांपासून ७० वर्षीय वृद्धांपर्यंत सहभाग 

वृद्धांना संदेश देणारा हा प्रकल्प चर्चेत आहे. या प्रकल्पात ३ वर्षीय मुलांपासून ७० वर्षीय वृद्धापर्यंतचे लोक सहभागी आहेत. ते कार्ड किंवा इतर पद्धतीने नवी आशा निर्माण करण्यासाठी इतर लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्याचे काम करत आहेत. आता इतर शाळांनी प्रकल्पाला स्वीकारले आहे. 

बातम्या आणखी आहेत...