आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विदेशी विद्यार्थ्यांकडे वक्रदृष्टी वळवली आहे. अमेरिकेत पूर्णपणे ऑनलाइन क्लासद्वारे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी देश सोडून जावे, असे फर्मान ट्रम्प प्रशासनाने काढले. आयसीईने म्हटले की, पूर्णपणे ऑनलाइन क्लास अटेंड करत असलेले एफ-१ व एम-१ विदेशी विद्यार्थी अमेरिकेत राहू शकत नाहीत. अन्यथा त्यांना बळजबरीने देशाबाहेर घालवू. अमेरिकेत राहण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष वर्ग भरत असलेल्या शाळांत बदली करून घ्यावी लागेल.
> प्रत्यक्ष वर्गात जात असलेल्या विद्यार्थ्यांवर या निर्णयाचा परिणाम होणार नाही. आॅनलाइन व प्रत्यक्ष शिकत असलेल्यांवरही परिणाम होणार नाही. एम-१ व्होकेशनल प्रोग्रॅमचचे विद्यार्थी व एफ-१ इंग्रजी भाषेच्या प्रशिक्षणाच्या विद्यार्थ्यांनाही कोणतेही ऑनलाइन क्लास अटेंड करण्याची परवानगी मिळणार नाही.
भारतीय म्हणाले, इतके पैसे दिल्यानंतर आम्ही घरी तरी कसे परतायचे?
अमेरिकेत सध्या ८ लाख भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ट्रम्प प्रशासनाच्या आदेशामुळे हजारो भारतीय संभ्रमावस्थेत आहेत. कोलंबिया विद्यापीठातील अली इरशाद सत्र एप्रिलपासून ऑनलाइन क्लास करतोय. तो म्हणाला, पुढील सत्रापासून ऑनलाइन क्लास भरणार की नाही, हे आम्हाला माहीत नाही. इतके मोठे शुल्क भरल्यानंतर आम्ही घरी कसे जावे? रोहित शुक्ला हा मुंबईतून ऑनलाइन क्लास करत होता. ऑनलाइन क्लासेस सुरू राहिल्यास त्याच्यासारखे हजारो विद्यार्थी अमेरिकेला परतू शकणार नाहीत.
ट्रम्प यांच्या घोषणांमुळे या ३ गोष्टी शक्य
1 अमेरिकी विद्यापीठांत प्रवेश घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांचे फक्त ऑनलाइन वर्ग सुरू आहेत त्यांना एफ-१ वा एम-१ व्हिसा मिळणार नाही.
2 विद्यार्थ्यांना आधीच एफ-१ वा एम-१ व्हिसा मिळालेला असला तरी त्यांना या आधारे अमेरिकेत शिक्षणसाठी प्रवेश दिला जाणार नाही.
3 असे विद्यार्थी अमेरिकेत राहत असतील तर आगामी सेमिस्टरपासून त्यांचे एफ-१ वा एम-१ स्टेटस संपुष्टात आणून त्यांना मायदेशी पाठवले जाईल.
अन्वयार्थ
इमिग्रेशन अॅटर्नी सायरस मेहतांनुसार, शाळा-कॉलेज उघडता यावे म्हणून ट्रम्प प्रशासन विदेशी विद्यार्थ्यांवर असुरक्षित वातावरणात शिकण्यासाठी विद्यापीठात येण्यासाठी दबाव आणत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.