आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिजाबविरोधी आंदोलन:इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनाच्या आदल्या रात्री विद्यार्थ्यांना दिले होते विष

तेहरान2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलनाच्या ठरलेल्या कार्यक्रमाच्या आदल्या रात्री इराणमध्ये विद्यापीठांतील १२०० हून अधिक विद्यार्थी विषबाधेमुळे आजारी पडले होते. इराणी वृत्तसंस्था इस्नानुसार, खराजगी आणि अर्क विद्यापीठातील १२०० विद्यार्थ्यांनी उलटी, शारीरिक वेदनेच्या तक्रारी केल्या होत्या. अन्य चार विद्यापीठातूनही असेच वृत्त आले होते.

विद्यार्थी संघटनेने जाणीवपूर्वक विष दिल्याचा दावा केला आहे. इराणी अधिकाऱ्यांनी यासाठी पाण्यातील जीवाणूला जबाबदार धरले आहे. इराणच्या विद्यार्थी संघटनेने एका निवेदनात जीवाणूचा युक्तिवाद खोटा असल्याचे म्हटले आहे. उपचार सुविधा मिळू नयेत यासाठी क्लिनिक बंद करण्यात आले आणि इलेक्ट्रोलाइचा साठाही संपला होता,असा दावा केला आहे. यानंतर नाराज विद्यार्थ्यांनी अन्न रस्त्यावर टाकले.

बातम्या आणखी आहेत...