आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळ ग्रहावर प्राणवायू तयार करण्यात यश:'टोस्टर'सारख्या यंत्राद्वारे एका झाडाएवढा ऑक्सिजन तयार, तेथील प्रत्येक मोसमात यशस्वी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील संशोधक अनेक वर्षांपासून पृथ्वी शेजारच्या लाल अर्थात मंगळ ग्रहावर सजीवसृष्टीची शक्यता धुंडाळून पाहत आहेत. यासाठी तिथे ऑक्सिजन व पाणी तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अंतर्गत आता अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेला (नासा) मोठे यश मिळाले आहे. नासाने मार्सवर पाठवलेल्या टोस्टरच्या आकाराच्या एका यंत्रणाने प्रथमच मंगळाच्या पृष्ठभागावर ऑक्सिजन तयार केला आहे. हे संशोधन सायंस अ‍ॅडव्हान्स जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.

डिव्हाइसचे नाव MOXIE
या यंत्राचे नाव मार्स ऑक्सिजन इन-सितु रिसोर्स यूटिलायझेशन एक्सपेरिमेंट (MOXIE)आहे. हे यंत्र नासाने गतवर्षी पर्सिव्हरेन्स रोव्हर मोहिमेसोबत मंगळावर पाठवले होते. संशोधकांच्या मते, MOXIE फेब्रुवारी 2021 पासून सातत्याने मार्सच्या कार्बन डायऑक्साइडने भरपूर असलेल्या वातावरणात ऑक्सिजनची निर्मिती करण्यात यशस्वी ठरले आहे.

MOXIE ला मार्सवरील कार्बन डायऑक्साइडयुक्त वातावरणात प्राणवायू तयार करण्यात यश आले आहे.
MOXIE ला मार्सवरील कार्बन डायऑक्साइडयुक्त वातावरणात प्राणवायू तयार करण्यात यश आले आहे.

छोट्या झाडाएवढा प्राणवायू तयार

संशोधकांनी सांगितले आहे की, MOXIE विविध प्रकारच्या वातावरणात ऑक्सिजन तयार करतो. ते रात्रंदिवस, मंगळ ग्रहावरील कोणत्याही वातावरणात आपल्या कामात यशस्वी ठरला आहे. डिव्हाइसवर 7 प्रयोग करण्यात आले. त्यात प्रत्येकवेळी ताशी 6 ग्रॅम ऑक्सिजन तयार करण्यात आला. पृथ्वीवर एवढा ऑक्सिजन एखादा छोटे झाड तयार करते. एकदा तर या यंत्राणे ताशी 10.4 ग्रॅम ऑक्सिजन तयार केला.

MOXIE कसे काम करतो?

मंगळाच्या वातावरणात कार्बन डायऑक्साइडचे (सीओटू) प्रमाण 96% आहे. MOXIE या वायूला एका फ्युअल सेलमधून पाठवून 798.9 डिग्री सेल्सियस (1,470 डिग्री फारेनहाइट) वर तापवतो. त्यानतंर सीओटूतून कार्बन मोनोऑक्साइड व ऑक्सिजनचे अणु विजेच्या मदतीने विभक्त करतो. त्यानंतर ऑक्सिजनच्या अणुंच्या मदतीने प्राणवायू तयार केला जातो.

MIT मधील MOXIE मोहिमेचे प्रमुख वैज्ञानिक मायकल हेच सांगतात - मंगळ ग्रहावर हवा अत्यंत विरळ आहे. ती पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 1 लाख फूट उंचीवर असल्यासारखी आहे. त्यानंतरही हे उपकरण एवढे चांगले काम करत आहे. हे आमच्यासाठी एक मोठे यश आहे.

MOXIE चे मोठे व्हर्जन तयार करण्याची तयारी

वैज्ञानिक MOXIE चे जम्बो व्हर्जन तयार करण्याच्या प्रयत्नांत आहेत. त्यांच्या मते, या यंत्राच्या 100 पट मोठे व्हर्जन तयार करण्यात यश आले तर मंगळावर एकाचवेळी शेकडो वृक्षांएवढा ऑक्सिजन तयार करता येईल. म्हणजे त्यातून प्रतितास 1 ते 3 किलोग्रॅम ऑक्सिजन तयार करता येईल. हेच यांच्या माहितीनुसार, हे तंत्रज्ञान अवगत करण्यात फारशी अडचण येणार नाही. MOXIE च्या यशामुळे मंगळ ग्रहावर मनुष्याला पाठवणे व त्यांना स्वयंपूर्ण बनवण्याच्या दिशेने मोठे यश आहे.

मंगळ ग्रहावर जाणे आजही कठीण

नासाचे अंतराळपटू जेफ्री हॉफमन यांच्या मते, मनुष्याला मंगळ ग्रहावर जाण्यासाठी 8 महिन्यांचा अवधी लागेल. त्यामुळे अंतराळपटूंकडे मुबलक अन्न व औषधी असणे गरजेचे आहे. याशिवाय एवढ्या प्रदिर्घ प्रवासात त्यांना मोठ्या प्रमाणात कॉस्मिक रेडिएशनचाही सामना करावा लागेल. पण मार्सवर सर्वात महत्वाचा आहे ऑक्सिजन. अंतराळपटूंना तिथे तात्पुरते राहण्यासाठीही याची गरज भासेल.

उल्लेखनीय बाब म्हणजे जगातील अनेक अंतराळ संशोधन संस्था मनुष्याला मार्सवर पाठवण्याची तयारी करत आहेत. चीनची 2023 अंतराळपटूंना मंगळावर पाठवण्याची इच्छा आहे. तर SpaceX चे CEO एलन मस्क 2029 पर्यंत असे करण्याची तयारी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...