आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटकांना वाचवण्यात यश:नेपाळमध्ये काली गंडकी नदीत वाहून गेलेल्या 7 भारतीयांना वाचवण्यात यश

काठमांडू16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेपाळमधील नदीत वाहून गेलेल्या सात भारतीय पर्यटकांना वाचवण्यात यश आले आहे. लुंबिनी प्रांतात ही घटना घडली. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील हे पर्यटक आहेत. बोटिंग करताना हे पर्यटक नदीत वाहून गेले होते. काली गंडकी नदीत गुरुवारी सायंकाळी हे पर्यटक नदीतून भ्रमंती करत होते. तेव्हा ते वाहून गेले होते. त्याचवेळी स्थानिकांच्या मदतीने सात पर्यटकांना राणी महल परिसरातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. वास्तविक गावकऱ्यांनी पर्यटकांना मान्सूनचा हंगाम असल्याने नदीत बोटिंग करू नका, असा सल्ला दिला होता. काली गंडकी नदीचा उगम तिबेटमध्ये होतो. नेपाळ हिमालय भागातील महत्त्वाची नदी म्हणून काली गंडकी नदी आेळखली जाते.

बातम्या आणखी आहेत...