आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजास्त गोडं खाणे आरोग्यासाठी हानीकारक असते. अशात लोक अनेकदा साखरेची चव शुगर-फ्री स्वीटनर्समध्ये शोधतात आणि त्याकडे वळतात. २०२१ मध्ये संशोधकांनी हाँगकाँगमध्ये विकल्या जाणाऱ्या पदार्थांची तपासणी केली तेव्हा च्युइंग गम आणि शीत पेयाशिवाय सॅलड ड्रेसिंग, ब्रेड, इन्स्टंट नूडल्स आणि अनेक क्रिस्पमध्येही स्वीटनर्स दिसून आले. आपल्या खाद्य पदार्थांत त्याचा वाटा सामान्य झाला आहे.
अमेरिकेत वापरले जाणारे एक स्वीटनर अॅडव्हान्टेम साखरेपेक्षा २० हजार पट जास्त गोड असते. साखर कमी वा न खाण्यामागची ३ सर्वात मोठी कारणे वजन वाढणे, मधुमेह आणि टूथ डीकेची समस्या आहे. इंटरनॅशनल स्वीटनर्स असोसिएशनच्या एका वेबसाइटनुसार, मधुमेही रुग्ण स्वीटनर्सचा वापर करतात. कारण त्याचा रक्तशर्करेवर काही परिणाम होणार नाही,असे त्यांना वाटत असते. वजन कमी करण्यासाठी लोक शुगर-फ्री स्वीटनर्स घेतात. कारण, त्याच्यात कॅलरी नसते. दुसरीकडे, साखरेच्या उलट यामुळे टूथ डिकेची समस्याही असत नाही. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जास्त स्वीटनर्स टाइप २ मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजाराचे कारण ठरू शकते. यासोबत वजनही वाढते. स्टेव्हिया नावाचे स्वीटनर रोज खाल्ल्याने मुलांच्या दातांचे नुकसान होऊ शकते.
शुगर फ्रीचा हृदयविकार असणाऱ्यांनाही धाेका असतो डब्ल्यूएचओ ड्राफ्ट गायडन्समध्ये नमूद केले की, शुगर-फ्री स्वीटनर वजन कमी करणे, मधुमेहज आणि हृदयविकार किंवा एका रुग्णाकडून दुसऱ्या रुग्णात संसर्गित होणाऱ्या आजाराचा धोका कमी करण्यासाठी वापरले नाही पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.