आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यास:अमेरिकेत टीनएजर्समध्ये वाढताहेत आत्महत्या; 2021 मध्ये दर तिसऱ्या मुलीच्या मनात विचार

अमेरिकाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीडीसीच्या अहवालानुसार, गेल्या एका दशकात तरुणाईत नैराश्य वाढले

अमेरिकेतील शाळेत दर तिसरा विद्यार्थी २०२१ मध्ये आत्महत्येचा विचार करत होता. यामध्ये २०१९ नंतर बरीच वाढ झाली आहे. किशोरवयीन मुलींसाठी चांगल्या मानसिक आरोग्याची गरज आहे याचे संकेत यातून मिळतात.

यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार(सीडीसी) २०२१ मध्ये ६० किशोरवयीन मुलींनी सांगितले की, त्यांना व्यथित वा दु:खी झाल्यासारखे वाटते. ही संख्या एका दशकात सर्वाधिक होती. दुसरीकडे, त्या वर्षी टीएजर मुलींच्या तुलनेत हा आकडा जवळपास दुप्पट होता. ही समस्या महामारीमुळे नाही. गेल्या एका दशकात तरुणाईमध्ये नैराश्य वाढले आहे. २०१५ मध्ये किशोरवयीनांमध्ये आत्महत्येचा दर ४० वर्षांच्या उच्च पातळीवर गेला.

टीनएजर मुलांच्या तुलनेत मुलींमध्ये आत्महत्येचा विचार आणि वर्तन वेगाने वाढत आहे. २०२१ मध्ये हायस्कूलमध्ये ३०% विद्यार्थ्यांनी सांगितले की, त्यांनी आत्महत्येचा विचार गांभिर्याने केला होता. २४ % नी आत्महत्येची योजना आखली होती. १३% ना आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर वैद्यकीय मदत घ्यावी लागली. मुलांमध्ये हे आकडे १४%, १२%,७% आणि २% होते. २०१९ पासून २०२१ दरम्यान आत्महत्येचा विचार आलेल्या हायस्कूलमधील अशा विद्यार्थ्यांत किरकोळ वाढ झाली.

शाळा-समाजआधारित मदत कार्यक्रमाची गरज
काही किशोरवयीनांमध्ये आत्महत्येची शक्यता इतरांच्या तुलनेत जास्त असते हे समजून घेणे गरजेचे आहे. आत्महत्या रोखण्यात मदत करण्यासाठी शाळा वा समाज आधारित मदत कार्यक्रम तयार करण्याची गरज संशोधकांना वाटते. आत्महत्या योग्य पाठिंब्याने रोखली जाऊ शकते.