आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काबूलमधील रशियन दुतावासाबाहेर आत्मघातकी हल्ला:2 रशियन डिप्लोमॅट्ससह 20 जण ठार; 6 वर्षांपूर्वीही झाला होता हल्ला

काबूलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या दारुल अमन भागातील रशियन दुतावासाबाहेर आत्मघातकी हल्ला झाला आहे. सोमवारी झालेल्या या हल्ल्यात 2 रशियन अधिकाऱ्यांसह 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, एका आत्मघातकही हल्लेखोराने रशियन दुतावासाबाहेर स्वतःला उडवून दिले. स्फोटावेळी काही अफगाणी नागरिक व्हिसा तयार करण्यासाठी तिथे उपस्थित होते. सुरक्षा अधिकाऱ्यांनी अद्याप या घटनेवर निवेदन जारी केले नाही.

दुतावासाबाहेर फिरत होता संशयित

दुतावासात तैनात सुरक्षा रक्षकाने सांगितले की, एक संशयित रशियन दुतावासाच्या बाहेर फिरत होता. तो गेटजवळ आला. आम्ही त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही तो थांबला नाही. त्यामुळे आम्ही त्याच्यावर गोळीबार केला. त्यात तो जखमी झाला. त्यानंतर तत्काळ त्याने स्वतःला उडवून दिले.

2016 मध्येही झाला होता धमाका

2016 मध्येही अफगाणिस्तान स्थित रशियन दुतावासाबाहेर स्फोट झाला होता. त्यातही 12 जण ठार, तर 20 हून अधिक जण जखमी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...