आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Summer born Babies Are The Youngest In The Class, With A Higher Risk Of Depression And Lagging Behind In Studies; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:ब्रिटन - उन्हाळ्यात जन्मलेल्या मुलांचे वय वर्गात सर्वात कमी, त्यांना नैराश्य व अभ्यासात मागे पडण्याचा जास्त धोका

लंडन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लंडनच्या किंग्ज कॉलेजसह 3 संस्थांचे 3 लाख मुलांवर संशोधन
  • वर्गातील इतर मित्रही त्यांना टाळत असल्याचा संशोधनात दावा

युरोपातील बहुतांश देशांत उन्हाळ्यात जन्मलेली मुले वर्गात सर्वात लहान असतात, यामुळे ती अभ्यासात मागे पडण्याचा जास्त धाेका असतो. त्यांना कमी गुण मिळतात. तसेच मोठे झाल्यावर नैराश्य व एडीएचडी (अटेन्शन डेफेसिट हायपर अॅक्टिव्हिटी) आजाराची जोखीम जास्त असते. सध्या इंग्लंडच्या शाळांमध्ये शैक्षणिक सत्र १ सप्टेंबर ते ३१ ऑगस्टपर्यंत असते. म्हणजेच जून ते ऑगस्टदरम्यान जन्मलेली मुले तोट्यात असतात. लंडनचे किंग्ज कॉलेज, कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट व ओरेब्रो विद्यापीठाच्या संयुक्त संशोधनात हा दावा करण्यात आला आहे.

संशोधकांचे म्हणणे आहे की, त्यांना शिकण्यासाठी कमी वेळ मिळला म्हणूनच नव्हे तर यामुळे ते व्यावहारिक, बौद्धिक व सामाजिकरीत्या कमी परिपक्व होतात. उदाहरणासाठी वय कमी असल्याने वर्गातील मित्र त्यांना कमी स्वीकारतात, यामुळे नंतर त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. संशोधनाचे नेतृत्व करणाऱ्या प्रा. जोना कुंट्सी म्हणतात, हे ‘समर बेबीज’ इतर मुलांच्या तुलनेत सुमारे एक वर्षापर्यंत लहान असू शकतात. १९९०-१९९७ दरम्यान जन्मलेल्या तीन लाख मुलांवर झालेल्या संशोधनानुसार वर्गात कमी वयाच्या मुलांना दीर्घकाळापर्यंत परिणाम भोगावे लागू शकतात. १६ ते २३ वर्षांचा होईपर्यंत अशा मुलांमध्ये संशोधकांना त्याच्या समकक्षांच्या तुलनेत नैराश्याचा धोका १४%, अभ्यासात मागे पडण्याचा १७% व व्यसनाचा धोका १४% जास्त दिसला.

तसेच ज्यांना एडीएचडीची समस्या होती, त्यांच्यात शिक्षणाचा धोका १२% आणि व्यसन लागण्याचा धोका २३% जास्त होता. प्रा. कुंट्सी सांगतात, वर्गात कमी वयाच्या सर्व मुलांमध्ये नकारात्मक गोष्टी दिसतीलच असे नाही. मात्र शाळांनी आधीपासूनच अशा मुलांसाठी लवचिक धोरण स्वीकारले तर मोठे झाल्यावर त्यांना अशा जोखमी होणार नाहीत. अशा मुलांकडून जास्त अपेक्षा ठेवायला नको. या समस्यांवर धोरणकर्ते, शिक्षक आणि डॉक्टरांना सखोलपणे काम करण्याची गरज असल्याचे संशोधकांना वाटते.

बातम्या आणखी आहेत...