आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सरकारला ४ महिने पूर्ण झाले आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते यादरम्यान त्यांची कामगिरी वाईट झाली नाही. बहुतांश लोकांच्या म्हणण्यानुसारअर्थव्यवस्था रुळावर येऊ लागली आहे. सीट बेल्ट न घालण्याच्या प्रकरणांदरम्यान जाणकारांचे म्हणणे आहे की, चार महिने थोडा अवधी आहे.ते आश्वासनाची पूर्तता करण्याचा विश्वास देऊ शकतील.
राजकीय आणि वित्तीय स्थैर्य
ब्रिटिश व्यावसायिक कुंदन शर्मा यांनी भास्करला सांगितले की, सुनक यांनी पाच मुद्दे महागाई, कर्ज, अर्थव्यवस्था, इमिग्रेशन आणि आरोग्य सेवांत सुधारणेचे लक्ष्य निश्चित केले आहे. राजकीय तज्ज्ञ मॅथ्यू डेव्हिस यांच्या म्हणण्यानुसार, टोरी पक्षातील अंतर्गत कलह दाबला हेच सुनक यांचे यश आहे. ते याआधीचे पंतप्रधान बोरिस जॉन्सनपेक्षा जास्त काळ राहिले आहेत वित्तीय संकट टळले आहे.
आर्थिक संकेतांत सुधारणा
महागाई कमी करणे आणि कर्ज घटण्याबाबत कुंदन शर्मा म्हणाले की, सुनक यांनी आर्थिक स्थैर्य कायम ठेवले आहे. ते जेव्हा आले होते तेव्हा महागाई दर ४१ वर्षांत सर्वाधिक ११.१% वर होता. तो १०.५% राहिला आहे. कॉन्फडरेशन ऑफ ब्रिटिश इंडस्ट्रीचे डीजी टोनी डेकर यांच्यानुसार, उलथा-पालथीच्या काळानंतर पंतप्रधानांनी अर्थव्यवस्था सांभाळली.

एनएचएस आणि संप : आरोग्य सेवांमध्ये(एचएचएस) रुग्णांसाठी प्रतीक्षा अवधी कमी करणे सुनक यांचे आणखी एक आश्वासन होते. त्यांनी सांगितले की, ते एनएचएस कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील डॉक्टर होते आणि आई फार्मासिस्ट होती. त्यांनी टास्क फोर्सही बनवला. मात्र, उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही. मात्र, प्रतीक्षा अवधी दोन वर्षांहून कमी झाला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.