आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Supporters Pelted Stones At The Police Who Came To Arrest Imran, Batoned The Police, Turned Lahore Into A Camp.

इम्रान यांना अटक करण्यास आलेल्या पोलिसांवर समर्थकांकडून दगडफेक:पोलिसांचा लाठीमार, लाहोरचे छावणीत रूपांतर

इस्लामाबाद/ लाहोर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यासाठी वॉरंट घेऊन पोहोचलेले पोलिस आणि इम्रान समर्थक एकमेकांशी भिडले. लाहोरमधील जमान पार्कमधील इम्रान यांच्या निवासस्थानाबाहेर सायंकाळी समर्थकांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनीही प्रत्युत्तरात लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. इस्लामाबादच्या डीआयजीसह अनेक पाेलिस जखमी झाले आहेत.

तोशाखाना प्रकरणात इस्लामाबादच्या जिल्हा न्यायालयाने इम्रान यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करत त्यांना १८ मार्च रोजी कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. अटक वॉरंटच्या विरोधात इम्रान यांनी उच्च न्यायालयात अपील केले आहे. यावर बुधवारी सुनावणी होईल. दरम्यान, समर्थकांना स्वातंत्र्यासाठी संघर्ष सुरूच ठेवण्याचे व्हिडिओ इम्रान आपल्या घरातूनच पोस्ट करत आहेत.

इम्रान खान यांच्या समर्थकांची अनेक शहरांत उग्र निदर्शने
इम्रान खान यांना अटक होण्याच्या शक्यतेवरून पीटीआय कार्यकर्ते लाहोर, कराची, पेशावर, क्वेट्टा, फैसलाबाद आणि सरगोधासह अनेक शहरांमध्ये निदर्शने करत आहेत. इम्रान यांच्या पक्ष कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी रास्ता रोको केला . पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि पीएमएनएलच्या नेत्या मरियम नवाज शरीफ यांच्याविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. लाहोरमध्ये इम्रान समर्थकांची वाढती संख्या पाहता राखीव पोलिस दलास पाचारण केले.

बातम्या आणखी आहेत...