आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्याच्या आधूनिक जगात विविध वैज्ञानिक चमत्कार घडतात. असाच एक चमत्कार फ्रान्समध्ये घडला आहे. येथील डॉक्टरांनी एका महिलेच्या नाकावर नाक उगवून तिच्या चेहऱ्यावर ट्रान्सप्लांट अर्थात प्रत्यारोपित केले. सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल झाली आहे.
त्याचे झाले असे की, फ्रान्समधील एका महिलेला नेसल कॅव्हिटी कॅन्सर ( Nasal Cavity Cancer ) झाला होता. यामुळे तिच्यावर नाक गमावण्याची वेळ आली होती. ती 2013 पासून नाकाविनाच राहत होती. पण वैद्यकीय चमत्कारामुळे तिला पुन्हा आपले नाक मिळाले.
Nasal Cavity Cancer एक धोकादायक कॅन्सर आहे. यामुळे अनेक रुग्णांना असह्य वेदना सहन कराव्या लागतात. यासंबंधीच्या वृत्तानुसार, या कर्करोगामुळे नाकालगतच्या संवेदना हरवतात. यामुळे रुग्ण आपले नाक गमावतो. फ्रान्सच्या महिलेसोबतही असेच झाले. पण थ्री डी प्रिंटिंगच्या मदतीने या महिलेला पुन्हा स्वतःचे नाक मिळाले.
स्थानिक वृत्तपत्रांच्या वृत्तानुसार, पीडित महिला 2013 पासून कर्करोगाचा सामना करत होती. रेडिओथेरेपी व कीमोथेरेपीमुळे तिचे नाक गेले होते. त्यावेळी विज्ञानाने एवढी प्रगती केली नव्हती. त्यामुळे ते फेशियल मास्कच्या मदतीने वावरत होती. पण थ्री डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने महिलेच्या हातावर नाक उगवण्यात आले. त्यानंतर ते तिच्या चेहऱ्यावर जोडण्यात आले.
Evening Standardच्या वृत्तानुसार, थ्री डी प्रिंटिंगच्या माध्यमातून महिलेच्या हातावर नाक उगवण्यात आले. त्यानंतर ते तिच्या चेहऱ्यावर ट्रान्सप्लांट करण्यात आले. प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर 10 दिवस रुग्णालयात औषध-पाणी घेतल्यानंतर या महिलेच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.