आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Surveillance On Corona | Scientists In European Countries, Including Britain, Fear Corona Contact Tracing App May Be Threatened By Privacy; Question On Transparency

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनावर पाळत:ब्रिटनसह युरोपियन देशांतील वैज्ञानिकांना भीती, अॅपमुळे गोपनीयतेला धोक्याची शक्यता

लंडनएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • 30 देशांच्या काँटॅक्ट ट्रेसिंग अॅपवर संशोधन, चीनचे अॅप कोणत्याच मानकांवर पात्र नाही

जगातील अनेक देश कोरोनाचा प्रसार जाणून घेण्यासाठी काँटॅक्ट ट्रेसिंग अ‍ॅपवर काम करत आहेत. आरोग्य सेतू अॅप भारतात लाँच करण्यात आले आहे, तर यूकेच्या एनएचएस-एक्सची अॅपची चाचणी सुरू आहे. शास्त्रज्ञ सुमारे ३० देशांच्या अ‍ॅपचा अभ्यास करत आहेत. ते या अ‍ॅप्सच्या वर्तनावर समाधानी नाहीत, विशेषत: डेटाच्या गोपनीयतेबाबत चिंताग्रस्त आहेत. ब्रिटनसह युरोपियन वैज्ञानिक आणि संशोधकांनीही या अ‍ॅप्सवर टीका करणारे एक मुक्त पत्र लिहिले आहे. हे अॅप्स वापरकर्त्यांच्या डेटा हाताळण्याविषयी, त्यांच्या गोपनीयतेसाठी पारदर्शक नाहीत, असे यात म्हटले आहे. डिझाइनमध्येही त्रुटी आहेत. उदाहरणार्थ, जेव्हा दोन लोक एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांचे अॅप ब्ल्यूटूथच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात येतात. अशा संपर्काची माहिती दोन्ही व्यक्तींच्या मोबाइलमध्ये सेव्ह होते. बरेच अ‍ॅप्स वापरकर्त्याचे लोकेशन डेटा एकत्र करतात. जर हा डेटा हॅकरच्या हाती लागला तर वापरकर्त्याच्या गोपनीयतेस मोठा धोका आहे. अॅप लाँच करण्यापूर्वी त्यांना अशा दुष्परिणामांचे विश्लेषण करण्याची संधी मिळावी, अशी शिफारस शास्त्रज्ञांनी केली आहे. हे विश्लेषण वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असले पाहिजे.

एमआयटी टेक्नॉलॉजीने ५ मानकांवरून जाणून घेतले

> ऐच्छिक : अॅप डाऊनलोड करण्यासाठी लोकांवर दबाव नाही.

> मर्यादित वापर : डेटा केवळ सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी वापरावा.

> डेटा नष्ट करणे : डेटा निश्चित वेळेवर (साधारणत: ३० दिवस) नष्ट होईल. युजर्सही स्वत: डिलीट करू शकतील.

> किमान सूचना : अॅप के‌वळ कोविड-१९ संबंधित ट्रेसिंगसाठी सूचना घेते.

> पारदर्शकता : नीती, डिझाइन सोर्स कोड सार्वजनिक.

देश : अॅपचे नाव : मानकांनुसार पात्र

अमेरिका :  सध्या नाही : ----------

ब्रिटन : एनएचएस-एक्स एेच्छिक, : पारदर्शक. सूचना.

इटली : इम्युनी  : पाच मानकांवर पात्र

फ्रान्स : स्टॉप कोविड : एेच्छिक

चीन : चायनीज हेल्थ कोड : पाचही मानकांवर पात्र नाही.

जर्मनी : कोरोना अॅप : एेच्छिक. डेटा नष्ट होईल.

भारत : आरोग्य सेतू : डेटा नष्ट होईल. पारदर्शी.

बातम्या आणखी आहेत...