आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत जगातील सर्वात तरुण लोकसंख्येचा देश आहे. २०२१ मध्ये ५२.९% लोकसंख्या तरुण होती. एका सर्वेक्षणानुसार, तरुणाईबाबत चकित करणारी बाब समोर आली आहे. ६३% लोक आपल्या तारुण्यावस्थेमुळे बर्नआऊट होत आहेत. स्टडी फाइंड डॉट कॉमच्या यात १००० पेक्षा जास्त जेन-जी(१९९७-२०१२ दरम्यान जन्मलेले) व मिलेनियल्स(१९८१-१९९६ दरम्यान जन्मलेले) लोकांचा समावेश केला करण्यात आला आहे.
सर्वांनी हे मान्य केले की, मोठे झाल्यानंतर वास्तव जगाचा सामना करण्यासाठी कठीण ठरत आहे. नात्यांबाबत बोलायचे झाल्यास २६% विवाहीत जेन-जीच्या म्हणण्यानुसार, आपल्या जोडीदारासोबत नाते टिकवणे आयुष्यातील कठीण काम आहे.दुसरीकडे, ३६% ना आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांची देखभाल सर्वात कठीण काम वाटतेयुवा आपल्या जबाबदारीचे ओझे उचलायला कधी शिकतील? याच्या उत्तरात १९% नी सांगितले की, ३० वर्षे वयापर्यंत हळूहळू ते हे सर्व करायला शिकतील. मात्रद्व मिलिने यल ४० व्या वयातही दैनंदिन कामाबाबत झगडतात. हा संघर्ष त्यांच्या बर्नआऊटचे कारण आहे. या कामांशिवाय ४९% युवांना बचत करणे, ४८% ना घर खरेदी आणि ४५% ना नोकरी शोधणे डोकेदुखीचे काम वाटते. हैराण करणारी बाब म्हणजे, स्वत:साठी जेवणाची व्यवस्था करण्यासाठी ते असहाय आहेत. यामुळे ४६% युवा स्वस्त नूडल्सचा पर्याय स्वीकारतात.
१७% चेक भरू शकत नाहीत, ४६%ना टायची अडचण १७% जेन-जी चेक भरू शकत नाहीत. २९% मिलेनियल मुलांचे डायपर बदल्यात कमीपणा वाटतो. ६३% लोक गाडीचे आॅईल बदलत नाहीत. २२% ना कर विवरण भरणे येत नाही. ४६% ना टाय बांधायला अडचण येते. १२% ना कपडे इस्त्री करणे माहीत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.