आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Suryadarshan Only 50 Days, Still Life Bright! Temperatures Drop To Minus 25 Degrees In Tromsø, Norway | Marathi News

ग्राउंड रिपोर्ट:सूर्यदर्शन केवळ 50 दिवस, तरीही जीवन उजळलेले! नाॅर्वेच्या ट्राेमसाेमध्ये तापमान उणे 25 अंशांपर्यंत घसरते

अभिषेक रंजन रिसर्च फेलो, आर्क्टिक युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्वे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नाॅर्वेच्या ट्राेमसाेमध्ये तापमान उणे 25 अंशांपर्यंत घसरते, तरीही शाळा-कार्यालये बंद नसतात

चार वर्षांपूर्वी नाॅर्वेच्या ट्राेमसाे शहरात आलाे तेव्हा येथील जगणे किती कठीण असेल असा विचार करत हाेताे. कारण येथे ५०-५० दिवस सूर्यदर्शनच हाेत नाही. तापमान उणे २५ अंशांवर जाते. बर्फावरून घसरून जखमी हाेणे सामान्य बाब आहे. अंधारात अपघातही खूप हाेतात. वस्तू खूप महागड्या आहेत. अशा ठिकाणी कसा राहू शकेल? परंतु नाण्याची ही केवळ एक बाजू आहे. अनेकदा निगेटिव्हिटीमध्ये पाॅझिटिव्हिटी असते. दृष्टिकाेन मात्र बदलावा लागताे. मग समाेरील चित्र आपाेआप बदलते. हा वृत्तलेख वाचताना तुम्हाला आपणही तेथे वास्तव्याला असताे तर असा विचार मनात आल्याशिवाय राहणार नाही एवढे नक्की सांगताे. हाच अनुभव मलाही येताे.

चाेहीबाजूंनी डाेंगरामध्ये हे ७० हजार लाेकसंख्येचे शहर वसले असून मधोमध समुद्र आहे. आकाशात नैसर्गिक चमकणारा रंग आणि दोन्ही किनाऱ्यांवर लोकवस्तीचे चित्र पाहताच नजरेत भरते. सूर्यदर्शन होणार नसलेल्या ५० दिवसांच्या आधीच येथील नागरिक व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी व आेमेगा बी-१२ चे सप्लिमेंट्सची व्यवस्था करून ठेवतात. म्हणजे शरीरात पोषणमूल्यांची कमतरता भासू नये. सगळेच लोक काही वेळ तरी एलईडी लाइटसमोर ठाण मांडून बसतात. शरीरात सूर्याच्या प्रकाशाची उणीव भरून काढण्याचा हा प्रयत्न असतो.

म्हणूनच झाडांच्या समोरही लाइट लावलेले असतात. त्यामुळे झाडांनाही जीवनदान मिळावे असा उद्देश असतो. बर्फावरून घसरून पडू नये म्हणून स्पाइक्स लावलेले असतात. घराबाहेर पडताना रेट्रो रिफ्लेक्टर परिधान करतात. त्यावर प्रकाश पडताच ते चमकू लागतात. अपघात टाळण्यासाठी हा खटाटोप करावा लागतो. थंडी किंवा उष्णता, बर्फवृष्टी असो की पाऊस..येथील शाळा-महाविद्यालये आणि कार्यालयांच्या वेळापत्रकात काहीही बदल केला जात नाही. त्यांची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी सुमारे ४ वाजेपर्यंत असते. लोक अतिशय उत्साहाने जीवनाचा आनंद घेतात. पैशांबद्दल तर विचारही करत नाहीत. बचतही करत नाहीत. कारण उपचार व शिक्षणाचा खर्च सरकार करते. चालक-क्लीनरसारखे काम करणारेदेखील मासिक अडीच ते तीन लाख रुपये कमावतात. एक सिनेमा हॉल आहे. तेथे विविध भाषांतील चित्रपट पाहता येतात. त्यात इंग्लिश सबटायटल्स असतात. अलीकडेच लालसिंह चड्ढा व आरआरआरही झळकले होते. या भागात गुन्हेगारी शून्य म्हणावी लागेल. तुमची पर्स बसमध्ये पडली असल्यास बहुदा ती तेथेच सापडेल. रोख रकमेची काहीही कटकट नाही. सर्वकाही डिजिटल आहे. हिंसाचार तर दूरच लोक ओरडून बाेलतही नाहीत. बहुतांश लोकांकडे ऑडी,

मर्सिडीज व टेस्लासारख्या लक्झरी कारही आहेत. गृहिणी अशी काही संकल्पना दिसत नाही.महिला-पुरुषांना बरोबरीचा दर्जा आहे. दोघे मिळून घरातील कामे करतात. तशी तर मोठी लोकसंख्या लिव्ह-इनमध्ये आहे. महागाईमुळे विवाह टाळतात. प्रत्येक जण निरोगी, तंदुरुस्त आहे. कारण प्रत्येक जण स्वत:च्या आरोग्याबद्दल जागृत आहे. स्वच्छता हा येथील संस्कृतीचा अविभाज्य घटक म्हणावा लागेल. तुम्हाला कुठेही अस्वच्छता दिसणार नाही. कचऱ्याचे उत्तम व्यवस्थापन केलेले आहे. हवेची गुणवत्ताही चांगली आहे. नागरिक निसर्गात जास्तीत जास्त राहतात. त्यांना स्कीइंग पसंत आहे. त्यामुळेच येथील सरासरी वयोमानही तुलनेने जास्त आहे. कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीत पोलिस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका पंधरा मिनिटांत हजर होते. एखादी व्यक्ती डोंगरात अडकल्यास तत्काळ हेलिकॉप्टरने मदत दिली जाते. एवढेच नाही तर तुम्ही जगाच्या काेणत्याही कानाकोपऱ्यात अडकले तरी तुमच्यापर्यंत मदत पोहोचवली जाते. कारण त्यांच्यासाठी प्राणापेक्षा मौल्यवान काहीही नाही. हवामानाचा अंदाज अचूक असतो. वाहतुकीचा खोळंबा शोधूनही सापडत नाही. लोक वाहतुकीचे नियम प्रामाणिकपणे पालन करतात. लोक परस्परांच्या प्रायव्हसीचा नितांत आदर करतात. शुक्रवार-शनिवारी रात्री पार्ट्या रंगतात. परंतु नशेत हिंसा तर दूर आरडाआेरडादेखील नसतो. भारतासारख्या आशियाई देशातून येथे शिक्षणासाठी येऊ इच्छिणाऱ्यांना प्रति सेमिस्टर ७-८ लाख रुपये शुल्क द्यावे लागते. राहणे-खाण्याचा खर्च वेगळा असतो. नागरिकत्वासाठी तीन वर्षे वास्तव्य करावे लागते. नॉर्वेइन भाषाही शिकणे अनिवार्य अाहे. ७० हजार लोकसंख्येत केवळ १०० भारतीय आहेत. बटाटे, कांदे, टोमॅटो, भेंडी अतिशय महाग मिळते. भेंडी ८०० रुपये किलो व पनीरही ८०० रुपये किलो आहे. बटाटे-१५०-२०० रुपये किलो, तर दूध १५० रुपये प्रतिलिटर मिळते. पाकिस्तानी नागरिकांची संख्या येथे जास्त आहे. कदाचित यामुळे येथे एकही मंदिर नाही. मात्र,एक मशीद आहे. चर्चची संख्या जास्त आहे.

सुविधांमुळे जीवन बनले सुकर..
{स्किल्ड जॉबमध्ये किमान वेतन १,८४० प्रती तास व अनस्किल्डमध्ये १,६५६ रुपये तास आहे.
{नोकरी गेल्यास बेरोजगारी भत्ता दिला जातो.
{५ वर्षेही नोकरी केल्यास निवृत्तिवेतन निश्चित.
{अपत्य संगाेपन भत्ता प्रतिमहा १२ हजार.
{पत्नी गरोदर असल्यास नऊ महिने पेड लीव्ह.
{उपचार खर्च १६ हजारांपर्यंत. त्यावर मोफत.

बातम्या आणखी आहेत...