आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतवंशीय सुषमा द्विवेदी अमेरिकेतील पहिल्या महिला पुरोहित ठरल्या आहेत. अमेरिकेत विविध प्रकारचे अनुष्ठान पुरुषांकडून करून घेतले जातात. परंतु विवाह समारंभातील सप्तपदी किंवा इतर अनुष्ठान असो हे स्वत: करण्याचा संकल्प सुषमा यांनी केला होता. मात्र त्यांना प्रत्यक्ष काम करण्यापूर्वी आजीची परवानगी घ्यावी लागली.सुषमा यांच्या आजीने प्रत्यक्ष अशा प्रकारे कोणतेही अनुष्ठान केलेले नव्हते. परंतु नातीसाठी पुराेहित म्हणून काम करण्यासाठी आवश्यक असे वेद- मंत्रांचे ज्ञान त्यांच्याकडे होते. सुषमा यांनी आजीशी याबाबत चर्चा केली. तेव्हा आजीला आनंद झाला. त्यानंतर आजी व नातीने ग्रंथांचा अभ्यास केला. हीच पौराणिक हिंदू व्यवस्था आहे. तुम्ही पुढच्या पिढीला ज्ञान देत असता. द्विवेदींना हिंदू धर्माचे ज्ञानही आजी-आजोबांकडून मिळाले. कारण कॅनडात लहानच्या मोठ्या झालेल्या सुषमा यांच्यासाठी आजी-आजोबाच या ज्ञानाचे स्रोत होते. त्यांनी माँट्रियलमध्ये मंदिराच्या उभारणीत मोठी भूमिका निभावली. सुषमा यांनी जातपात, लिंग, वंश इत्यादीहून अधिक श्रेष्ठ असे आशीर्वाद अनुष्ठान केले. सुषमा यांनी या क्षेत्रात खूप परिश्रम घेतले. म्हणूनच त्या आज अमेरिकेतील पहिल्या महिला पुरोहित ठरल्या आहेत. त्या समलैंगिकांचे देखील विवाह करतात.
महिला पुरोहित आता नेतृत्वाच्या भूमिकेत
धर्म व परंपरेच्या अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेत सामान्यपणे महिला पुराेहितांची संख्या कमी आहे. परंतु हिंदू समुदायात मात्र महिला पुरोहित नेतृत्व करण्याच्या भूमिकेत आल्या आहेत. फ्लोरिडा विद्यापीठातील प्रोफेसर वसुधा नारायण म्हणाल्या, वेगवेगळ्या मंदिरांचे फलक वेगवेगळे असतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.