आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल जवाहिरीच्या मृत्यूवर सस्पेन्स:तालिबानचा दावा - डेडबॉडी आढळली नाही; अमेरिका म्हणाली - आम्हाला मृत्यूवर कोणताही संशय नाही

काबूल3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल कायदाचा म्होरक्या अयमान अल जवाहिरी याच्या मृत्यूवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अफगाणिस्तानच्या सत्ताधारी तालिबान सरकारने एकीकडे आपल्याला अद्याप जवाहिरीचा मृतदेह आढळला नसल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे, अमेरिकेने वारंवार जवाहिरीच्या मृत्यूविषयी आपल्याला कोणताही संशय नसल्याचे ठणकावून सांगितले आहे.

10 वर्षांपूर्वी अमेरिकेने ओसामा बिन लादेनचा खात्मा केला होता. त्यावेळी त्याच्या मृत्यूची पुष्टी करण्यासाठी डीएनए टेस्ट करण्यात आली होती. पण जवाहिरीच्या बाबतीत असे करण्यात आले नाही. जवाहिरी 1 ऑगस्ट रोजी काबूलमध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला होता.

व्हाइट हाऊसच्या मते, 'अमेरिकेकडे अनेक स्त्रोतांकडून मिळालेले पुरावे आहेत. त्यातून जवाहिरीच्या मृत्यूची पुष्टी होते.' त्यामुळे तो खरेच ठार झाला असेल तर त्याचा मृतदेह अद्याप का हाती लागला नाही? या प्रकरणी तालिबान खोटे बोलत आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्वतः जवाहिरीच्या मृत्यूची बातमी जगाला दिली होती.

अफगाणिस्तान काय म्हणाला?

तालिबान सरकारने म्हटले आहे की, ज्या घरात अमेरिकेने ड्रोन हल्ला केला, तिथे कुणीही राहत नव्हते. ते रिकामे होते. त्यामुळे जवाहिरी तिथे राहत होता, याची कोणतीही पुष्टी झाली नाही.

अमेरिकेने याच घरावर ड्रोन हल्ला करून जवाहिरीला यमसदनी पाठवले. सोशल मीडियावरील हे छायाचित्र त्याच घराचे असल्याचा दावा केला जात आहे.
अमेरिकेने याच घरावर ड्रोन हल्ला करून जवाहिरीला यमसदनी पाठवले. सोशल मीडियावरील हे छायाचित्र त्याच घराचे असल्याचा दावा केला जात आहे.

एका अमेरिकन अधिकाऱ्याच्या मते, जवाहिरी सेफ हाऊसमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होता. या हल्ल्यात त्याच्या कुटुंबाला कोणतेही नुकसान पोहोचले नाही. अमेरिकेने या हल्ल्याची खबर तालिबानला दिली नव्हती.

अमेरिकेने काय म्हटले?

व्हाइट हाउसचे प्रवक्ते जॉन किर्बी यांना याविषयी छेडले असता ते म्हणाले - आम्हाला कोणत्याही पुष्टीची गरज नाही. आमच्याकडे जवाहिरी ठार झाल्याचे मुबलक पुरावे आहेत. आमच्या यंत्रणांनी अनेक मेथड्सचा वापर केला. त्यामुळे डीएनए टेस्टची गरज भासली नाही. आता अफगाणिस्तानात अल कायदाचा कोणताही म्होरक्या उरला नाही.

प्रदिर्घ काळापासून होता रडारवर

अफगाणिस्तानच्या प्रमाणवेळेनुसार 1 ऑगस्ट सकाळी 6.18 मिनिटानी जवाहिरीवर हल्ला करण्यात आला. त्यावेळी अमेरिकेत शनिवारी रात्रीचे 9 वाजून 48 मिनिटे वाजले होते. अमेरिकन अधिकारी मागील 6 महिन्यांपासून जवाहिरीच्या मागावर होते.

बातम्या आणखी आहेत...