आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:कुठलीही लस कायमस्वरूपी प्रभावी राहण्याबाबत शंका; त्यामुळे नाकाने स्प्रे, प्रोटीनयुक्त, मृत विषाणूपासूनही लस तयार करणे सुरू

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 30 पेक्षा जास्त लसींची चाचणी, 2021 पर्यंत 67 लसींची क्लिनिकल ट्रायल सुरू होणार

कार्ल जिमर
कोरोना विषाणूच्या संकट काळात ३० पेक्षा जास्त लसींची माणसांवर चाचणी सुरू आहे. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ला मिळालेल्या माहितीनुसार, ८८ लसींची प्री-क्लिनिकल चाचणी सुरू आहे. त्यापैकी ६७ लसी २०२१ च्या अखेरपर्यंत क्लिनिकल ट्रायलच्या स्तरावर येण्याची अपेक्षा आहे.

मात्र, वैज्ञानिकांना लसीच्या प्रभावाबद्दलही चिंता आहे. ब्राझीलच्या साओ पाउलोत लसीचे संशोधक लुसियाना लेइट म्हणाले,‘ सुरक्षेसाठी कुठल्या प्रकारची रोगप्रतिकारशक्ती महत्त्वपूर्ण असेल हे माहीत नाही.” जॉर्जिया विद्यापीठातील इम्युनॉलॉजीचे संचालक टेड रॉस म्हणाले, ‘पहिली लस नंतरही तेवढीच प्रभावी राहील की नाही याची चिंता आहे. त्यामुळे वेगवेगळ्या रणनीतीवर काम करण्याची गरज आहे.’

काही कंपन्या आशा जागवणाऱ्या लसींवर काम करत आहेत. शरीराला संसर्गापासून रोखण्यास तयार करेल अशा लसीवर अमेरिकेत काम सुरू आहे. तीत स्पाइक नावाचे प्रोटीन विकसित होईल, ते कोरोना विषाणूला कव्हर करून रोखेल. ते अँटिबॉडीही तयार करेल. दुसरीकडे, ‘एपिव्हिक्स’ कंपनी कोरोना विषाणूच्या विविध भागांपासून तयार झालेल्या लसींच्या चाचण्या घेत आहे. विषाणूला कसे रोखता येईल हा त्याचा हेतू आहे. ‘एपिव्हिक्स’चे सीईओ अॅनी डी ग्रोट म्हणाले,‘हा सुरक्षेचा दुसरा थर आहे, तो अँटिबॉडीपेक्षा चांगले काम करू शकतो.’ डॉ. वेस्लर यांच्या सहकारी नील किंग यांची ‘आयकोसेव्हॅक्स’ स्टार्टअप या वर्षी नॅनोपार्टिकल लसीची क्लिनिकल ट्रायल घेईल. अमेरिकेच्या वॉल्टर रीड आर्मी इन्स्टिट्यूटचे संशोधक नॅनोपार्टिकल लसीच्या क्लिनिकल ट्रायलसाठी स्वयंसेवकाची भरती करत आहेत. या वर्षअखेरीस ही चाचणी होईल.

न्यूयॉर्कची ‘कोडोजेनिक्स’ ही कंपनी नाकात स्प्रे करणारी लस बनवत आहे. तिची पहिली चाचणी सप्टेंबरमध्ये होईल. या कंपनीच्या मते, ही लस शीतज्वराच्या फ्लूविस्टप्रमाणेच प्रभावी ठरू शकते, कारण विषाणू श्वासाद्वारेच शरीरात जातो.

चीन : चाचणी पूर्ण होण्याआधी २ लसींच्या आपत्कालीन वापरास मंजुरी
चीनमध्ये कोरोनाव्हॅक लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे तिची चाचणी अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाही. तिचा वापर एका योजनेचा भाग या रूपात केला जात आहे. ती उच्च जोखीम असलेल्या उदा. मेडिकल, नर्सिंग स्टाफ आणि ज्यांना संसर्गाचा जास्त धोका आहे अशा लोकांना देण्यात येईल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser