आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या अत्याचाराच्या विराेधात लढा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यां करीमा बलाेच कॅनडाच्या हार्बरफ्रंटमध्ये संशयास्पद स्थितीत मृत आढळून आल्या. रविवारी त्या अचानक बेपत्ता झाल्या हाेत्या. साेमवारी त्यांचा मृतदेह एका सराेवराच्या किनारी आढळला. करीमा बलूच यांचे पती हम्माल व भावास मृतदेहाची आेळख पटली आहे.करीमा २०१६ मध्ये काही मित्र व बलुच समर्थकांच्या मदतीने बलुचिस्तानहून पळून कॅनडाच्या आश्रयाला आल्या हाेत्या. त्या बलाेच स्टुंडट आॅर्गनायझेशनच्या अध्यक्षही हाेत्या. सूत्रांच्या मते, त्यांना अखेरच्या रविवारी एका अज्ञात व्यक्तीसाेबत पाहण्यात आले हाेते. या घटनेच्या तपासासाठी कॅनडात बलुच समर्थकांनी मंगळवारी निदर्शने केली.
कॅनडात बलाेच पिपल्स काँग्रेसच्या अध्यक्ष नाएला कादरी बलाेच यांनी करीमा यांच्या मृत्यूमागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याचा आराेप केला. टाेरँटाेमध्ये राहणाऱ्या नाएलाने कॅनडात बलुच लाेकांच्या सुरक्षेची मागणी केली. करीमा बलुच यांची हत्या हा आमच्यासाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. आपला आवाज उठवणारे बलुच कार्यकर्ते सुरक्षित नाहीत. ते देश साेडून देतात. कारण आयएसआयचे गुंड त्यांची हत्या करतात. ते आमचा पाठलाग करतात, असे नाएला यांनी सांगितले.करीमा माजी पाकिस्तानी सैन्याधिकाऱ्यांवर कडवट टीका करत. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या सर्वात जास्त सक्रिय नेत्यांमध्ये करीमांही होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.