आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछायाचित्र नॉर्वेच्या स्वालबार्डचे आहे. जगातील सर्वात स्वच्छ हवा असलेला हा परिसर आहे. आर्क्टिक क्षेत्रातील या परिसरात पर्यावरणाला स्वच्छ ठेवण्यासाठी वाय-फायवर बंदी आहे. येथे चोरीची भीती नसल्यामुळे इमारतींना टाळे लावलेले दिसत नाही. आर्क्टिकचे वाळवंट म्हणूनही हा भाग आेळखला जातो. आर्क्टिक महासागरात नॉर्वेजियन बेटांच्या समूहावर स्वालबार्डमध्ये १ हजार ८२४ फूट उंच पर्वत आहेत.
नेहमी बर्फाची शुभ्र दुलई पांघरलेल्या या भागात थंडीच्या ऋतूत केवळ ४५ जणांना मुक्कामाची परवानगी मिळते. उन्हाळ्याच्या काळात येथील लोकसंख्या १५० वर जाते. उत्तर ध्रुवापासून सुमारे १ हजार २३१ किमीवरील ही शेवटची मानवी वस्ती आहे. या भागात वर्षभरात ११२ रात्री चोवीस तास असतात तर १२९ दिवस सूर्य चोवीस तास तळपत असतो, हेदेखील याचे वैशिष्ट्य आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.