आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकन अंतराळ संस्था नासाने मंगळ ग्रहावर पाणी आणि जीवसृष्टीचा तपास करण्यासाठी एका रोव्हरला पाठवले आहे. 'पर्सिव्हरन्स रोव्हर'ची यशस्वी लँडिंग ही भारतीय वेळेनुसार रात्री दोन वाजता करण्यात आली. या लँडिंगचे संपूर्ण श्रेय एका भारतीय वंशांच्या महिल्या शास्त्रज्ञाला जाते. या संपूर्ण मिशनला 203 दिवस लागले असून या सहा पायांच्या रोबोटने सात महिन्यात 47 कोटी किलोमीटरचा प्रवास पूर्ण करुन मंगळ गाठले. या संपूर्ण मिशनमधील सर्वात कठीण आणि धोकादायक क्षण तो होता रोव्हर मंगळावरील सर्वात अवघड जजिरो क्रेटरवर उतरण्याचा. शेवटच्या सात मिनटात रोव्हराचा वेग हा शुन्यावर आणत सुरक्षित लँडिंग करण्याची मोठी जबाबदारी भारतीय वंशाच्या अमेरिकन शास्त्रज्ञ डॉ. स्वाती मोहन यांनी यशस्वीरित्या पेलली.
सर्वात मोठी जबाबदारी स्वातीवर होती
'दि सांयस'ने सांगितल्यानुसार, मंगळ ग्रहाजवळ पोहचणे सोपे असून सर्वात कठीण काम रोव्हरच्या लँडिंगचे होते. कारण, बहुतेक रोव्हर या स्टेजला येऊन बंद पडतात. 'पर्सिव्हरन्स रोव्हर'ने शेवटच्या 7 मिनटात 12 हजार मैल प्रति तासावरून शुन्यावर येत यशस्वीरित्या लँडिंग केली. या उंचीवर, रोव्हरच्या वेगाला शुन्यावर आणत नंतर परत त्याला लँड करणे हे काही चत्मकारापेक्षा कमी नव्हते. परंतु, डॉक्टर स्वाती मोहन आणि त्यांच्या टीमने ही कामगिरी यशस्वीरित्यापुर्ण केली.
‘टचडाउन कन्फर्म्ड’
स्वाती या इंजीनियर आहेत. 'पर्सिव्हरन्स रोव्हर'ने लँडिंग करताच याच्या हॅलिकॉप्टरने पंख उघडले. हे रोव्हर लँड होताच स्वाती आणि त्यांच्या टीमच्या चेहऱ्यावरील आनंद सर्वांना दिसत होता. यानंतर संपूर्ण जगाला एक मेसेज मिळाला 'Touchdown confirmed' म्हणजेच लँडिंग यशस्वी झाली. हे ऐकण्यासाठी संपूर्ण जग उत्सुक होते.
कोण आहेत डॉक्टर स्वाती मोहन ?
स्वाती या मुळ भारतीय असून एका वर्षांच्या असताना त्यांचे आई-वडील अमेरिकेला स्थंलातरित झाले होते. यानंतर स्वाती नॉदर्न वर्जिनियात लहानाच्या मोठ्या झाल्या. 9 वर्षांच्या असताना स्वाती यांनी पहिल्यांदाच 'स्टार ट्रेक' सीरीज पाहिली आणि अंतराळात काहीतरी शोधण्याचा निर्णय घेतला. यानंतर स्वाती यांनी इंजिनियरिंग आणि स्पेस एक्सप्लोरेशेनमध्ये करियर बनविण्याचे ठरवले. कॉर्नेल विद्यापीठात मॅकेनिकल आणि ऐरोस्पेसमध्ये इंजिनियरिंग केल्यानंतर त्यांनी आपली पीएसडी पूर्ण केली.
नासाचा अनेक वर्षांचा अनुभव
नासाच्या मिशन मंगळ आणि विशेषतः पर्सिव्हरन्स रोव्हरसोबत स्वाती आधीपासूनच जोडल्या गेल्या आहेत. पासाडेनामध्ये नासाच्या जेट प्रॉपल्शन युनिटमध्ये त्यांनी अनेक दिवस काम केले आहे. दरम्यान, काही स्पेस मिशन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर रिसर्च करत असताना त्यांनी शनी म्हणजेच सॅटर्न संबंधित मिशनमध्येही चांगली जबाबदारी केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.