आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वीडन लॉकडाऊन का टाळतेय:ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर स्वीडनने सुनावले, कोरोनाचे उच्चाटन करू 

स्टाॅकहाेम3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • बाधितांची संख्या 10 हजारांवर, 800 हून जास्त जणांचा मृत्यू

युराेपात स्वीडन वगळता सर्व देशांत लाॅकडाऊन आहे. परंतु स्वीडनमध्ये रेस्तराँ, हाॅटेल, बारपासून सर्व शाळा-कार्यालये सुरू ठेवली आहेत. लाेक स्वेच्छेने करत असलेल्या उपायांवर सरकार विसंबून आहे. स्वीडन सरकारच्या या वर्तनावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनी आक्षेप घेतला आहे. स्वीडनचे वागणे झुंडीसारखे आहे. त्यामुळे युराेपला माेठा फटका बसला आहे. त्याला स्वीडनचे परराष्ट्रमंत्री एेन लिंडे यांनी उत्तर दिले. ट्रम्प यांचे वक्तव्य तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचे आहे. आमचे पाेलिस अतिशय प्रभावीपणे काम करत आहेत. आम्ही हार्ड इम्युनिटी थिअरीवर काम करत आहाेत. संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढल्यास लाेकांची राेगप्रतिकारशक्ती वाढण्याची शक्यता आहे. गंभीर अाजारी असलेल्या लाेकांना सरकार मदत करत आहे. आम्ही लाॅकडाऊन नव्हे, स्वत: जबाबदारीने वागणाऱ्या लाेकांवर विश्वास ठेवताे. देशाचे साथराेगतज्ञ अँड्रेस टेंग्नेल म्हणाले, ट्रम्प यांना स्वीडन चुकीचा वाटताे. आम्ही अगदी याेग्य काम करत आहाेत. हे गुणवत्तेचे काम आहे. आतापर्यंत स्वीडनच्या आराेग्य विभागाने या महामारीला अतिशय चांगल्या प्रकारे हाताळले आहे. ९ एप्रिलपर्यंत स्वीडनमध्ये ९ हजार १४१ बाधित लाेक आहेत.    

स्वीडनने गर्दी जमवली आहे. खरे तर स्वीडनला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. वाईट स्थिती असताना ते झुंड जमा करू लागले आहेत, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मिश्किलपणे टोला लगावला होता. 

स्वीडन झुंडीच्या इम्युनिटीचे पालन करत आहेत, असे ट्रम्प यांना वाटते. परंतु, तथ्यात्मकदृष्ट्या त्यांचे म्हणणे चुकीचे ठरते. आम्हाला आमच्या लोकांवर विश्वास आहे. लोक जबाबदारी घेतील, असे परराष्ट्र मंत्री लिंडे यांनी म्हटले. 


स्वेच्छा  धोरण : स्वीडनमध्ये वर्क फ्रॉम होमची कार्यसंस्कृती आधीपासू
नच 

  • ७० टक्क्यांहून जास्त लाेक घरातच काम करत आहेत. कारण येथील जास्त टेक्नाेसॅव्ही आहेत. रिमाेट वर्किंग प्रॅक्टिसला येथे प्राेत्साहन देणारे धाेरण आहे.
  • सार्वजनिक वाहतुकीवर ताण ५० टक्क्यांनी कमी झाला आहे.
  • स्वीडनच्या या वर्तनामागे भाैगाेलिकताही आहे. भूमध्यसागरीय देशांत अनेक पिढ्या एकाच घरात राहतात. स्वीडनमध्ये मात्र एका घरात केवळ एकच व्यक्ती राहते. त्यामुळे विषाणूचा प्रादुर्भाव हाेण्याची शक्यता कमी हाेते.

पण, वास्तव वेगळे.. १० लाखांमागे ६७ मृत्यू, शेजारच्या नॉर्वेमध्ये १९ मृत्युमुखी

  • स्वीडनमध्ये आतापर्यंत ९,१४१ बाधित लोक आढळले. ७९३ मृत्युमुखी पडले. ८ एप्रिल पर्यंत स्वीडनमध्ये १० लाख लोकांमागे ६७ जणांचा मृत्यू झाला.
  • शेजारचा देश नॉर्वेमध्ये १० लाख लोकांमागे १९ व फिनलँडमध्ये १० लाखांमागे ७ मृत्युमुखी पडले.
  • स्वीडनमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येत दोन दिवसांत अचानक वाढ झाली आहे. बुधवार व गुरूवार दरम्यान १०० हून जास्त मृत्यू झाले. एप्रिल अखेरीस ४० टक्के लोक बाधित झाले.
बातम्या आणखी आहेत...