आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:सिडनी 100 दिवसांनी खुले; स्वातंत्र्य दिनासारखा जल्लोष, सुरक्षा नियमांचे पाळून विषाणूसोबत जगण्याचा संकल्प

सिडनी14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कडक लाॅकडाऊनच्या १०० दिवसांनंतर साेमवारी १२:०१ वाजेपासून सिडनीत सामान्य लाेक रस्त्यावर आले हाेते. वेलकम बॅक सिडनीची घाेषणा, धावणाऱ्या गाड्या, आनंदाने वावरणारे लाेक असे चित्र पाहायला मिळाले. पब-रेस्तराँ, सलून, बेकरी व जिमही खुल्या झाल्या. जणू नागरिकांनी स्वातंत्र्य दिन साजरा केला. सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करून जीवन जगण्याचा संकल्प लाेकांनी केला आहे. न्यू साऊथ वेल्स प्रांतात सिडनी येते. साेळा वर्षांहून जास्त वयाच्या ७४ टक्के लाेकांना लसीचा दुसरा डाेसही देण्यात आला आहे. पंतप्रधान स्काॅट माॅरिसन यांनी सिडनीतील लाेकांसाठी संदेश दिला. ते म्हणाले, तुम्ही कुटुंब, मित्र-परिवारासह सगळ्या गाेष्टींचा आनंद लुटा. आपल्यापैकी बहुतेक लाेक या दिवसाची प्रतीक्षा करत हाेते. आॅस्ट्रेलियाने पुढील महिन्यापासून दाेन डाेस घेतलेल्या लाेकांना देशात फिरण्याची तसेच परदेशात जाण्याची सवलत देऊ, अशी घाेषणा केली हाेती.

मलेशिया: नऊ महिन्यांनंतर खुले
मलेशियात साेमवारपासून देशांतर्गत वाहतुकीस परवानगी दिली. मलेशियात अजूनही संसर्गाचे राेज हजाराे रुग्ण आढळतात.

इंडोनेशिया: निर्बंध हटवले
इंडाेनेशियाने साेमवारी आपली सीमा सुरू केली आहे. दक्षिणपूर्व आशियातील सर्वात माेठी अर्थव्यवस्था असलेल्या इतर १८ देशांतील लाेकांना प्रवेश आहे.

सीमा सुरू करण्याचे प्रयत्न
- पूर्ण लसीकरण झालेल्या लाेकांना शहरांत ये-जा करण्याची सवलत दिली जात आहे.
- पाॅझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांहून कमी असलेल्या देशातील लाेकांना प्रवेश दिला जाणार आहे.
- सीरो सर्वेद्वारे धोरण ठरवणार.

सीमाही खुल्या, न्यू नॉर्मलसोबत जीवन जगणार
लसीचे दाेन डाेस घेतलेल्या परदेशातील लाेकांना डिसेंबरपासून प्रवेश दिला जाणार आहे. जूनपासून संपूर्ण नियम शिथिल करण्याची योजना आहे.

थायलँड : पर्यटकांना मुभा
थायलंडने पुढील महिन्यापासून बँकाॅकसह देशातील इतर पर्यटनस्थळे सुरू करण्याची घाेषणा केली आहे. यातून देशाच्या पर्यटनाला गती देण्याचा उद्देश आहे.

बातम्या आणखी आहेत...