आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Symbols, Customs Of Indian Army Will Also Change; Beating The Retreat Also In Indian Colors | Marathi News

प्रजासत्ताक दिन:भारतीय लष्कराचे प्रतीक, प्रथाही बदलणार ; बीटिंग द रिट्रीटही भारतीय रंगात

नवी दिल्ली8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाैदल ध्वजातील बदलानंतर आता भारतीय लष्करातील ब्रिटिशकालीन परंपरा, प्रथा, चिन्ह, पाेषाखाची नावे बदलण्याची तयारी केली जात आहे. लष्कर कमांडरांच्या गेल्या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी गुलामीची आठवण करून देणाऱ्या सर्व प्रतीकांना साेडून दिले जाईल. लष्कराच्या पाेषाखात खांद्यावर परिधान केल्या जाणाऱ्या लेनयार्डपासून जातीवर आधारित रेजिमेंटच्या नावाचाही फेरविचार केला जाणार आहे. सकारात्मक नावे, प्रथा कायम ठेवल्या जाणार आहेत. अनेक छावण्या किंवा लष्करी प्रतिष्ठानांचे रस्ते, उद्याने, इमारतींची नावे तत्कालीन जनरलच्या नावावर ठेवलेले हाेते. अशा नावांची देखील यादी तयार केली जात आहे. त्यांना आता स्वतंत्र भारतातील लष्करी नायकांच्या नावे देण्याचा प्रस्ताव आहे. प्रजासत्ताक दिनाच्या बीटिंग द रिट्रीट देखील भारतीय रंगात न्हाऊन जाईल. तशी तयारी सुरू आहे.

नाैदलातही बदल
नाैदलाच्या पाेषाखात नेल्सन रिंग्सही राॅयल नेव्हीचा वारसा आहे. त्यात बदल करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या रिंगच्या माध्यमातून नाैदलाच्या अधिकाऱ्यांची रँक दर्शवली जाते. साेन्याच्या एम्ब्रॉयडरीमध्ये एक, दाेन आणि तीन श्रेणीतून वेगवेगळ्या रँकची माहिती मिळते. दाेन वर्षांपूर्वीच्या या प्रतीकांनादेखील बदलले जाऊ शकते.