आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍य मराठी विशेष:65वर्षांहून जास्त वयाच्या व्यक्तीला सातत्याने वाईट स्वप्ने पडणे ही पार्किन्सन्सची लक्षणे

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वृद्धांना वारंवार वाईट स्वप्न पडणे हे पार्किन्सन्सचे लक्षण असू शकते, असा दावा बर्मिंगहॅम विद्यापीठातील न्यूराॅलाॅजिस्ट आबिदेमी आेटाइकू यांनी केलेल्या अहवालातून करण्यात आला आहे. ६५ वर्षांहून जास्त वयाच्या व्यक्तींना वारंवार वाईट स्वप्नांमुळे दीर्घकाळ त्रास हाेत असल्यास ही बाब न्यूराॅलाॅजिकल आजाराशी संबंधित इशारा असू शकताे. न्यूराॅलाॅजिस्ट आबिदेमी यांच्या अभ्यासानंतर हा आजार म्हणजे पार्किन्सन्स असल्याचे स्पष्ट झाले. या आजाराने पीडित व्यक्तींना हात, पाय, जबड्यांत झटके जाणवतात. त्याचबराेबर त्याचे नियंत्रणही हाताबाहेर जाते. संपूर्ण जगात या आजाराने पीडितांची संख्या ४० लाख एवढी आहे. म्हणजेच एक लाखामागे १३ पोक या आजाराने पीडित आहेत.आजाराचे निदान हाेईपर्यंत पीडित व्यक्ती ६०-८० टक्के डाेपामाइन-रिलिजिंग न्यूराॅन्स गमावून बसताे. त्यापासून बचाव करायचा असल्यास अशा व्यक्तींना त्याबद्दल विचारणा करावी किंवा त्यांच्या शरीराच्या हालचालींबद्दलचे परीक्षण करावे. त्यातही पुरुषांना स्वप्नाबद्दल विचारले पाहिजे. स्वप्नामुळे त्रस्त असलेल्या व्यक्तींमध्ये अशी समस्या पाच पटीने वाढू शकते, असे आबिदेमी यांच्या आधीच्या संशाेधनातून स्पष्ट झाले आहे. वाईट स्वप्नांमुळे पार्किन्सन्ससारखा आजार झाल्याचे लक्षात येते, हे चांगले आहे. कारण आजाराची खात्री करण्यासाठी केल्या जाणाऱ्या चाचण्या अतिशय महागड्या असतात.पार्किन्सन्सच्या एक चतुर्थांश पीडितांना वाईट स्वप्ने पडतात.

बारा वर्षांचे संशोधन, जोखीम दुपटीने वाढते
बारा वर्षांच्या संशोधनात ३८१८ वयस्कर पुरुषांच्या मानसिक आजारावर निगराणी ठेवण्यात आली होती. त्यानुसार वारंवार वाईट स्वप्ने पडणाऱ्या वयस्करांची नोंद करण्यात आली. त्यातून त्यांच्यात पार्किन्सन्स होण्याची शक्यता दुपटीने वाढते, असे दिसून आले.

बातम्या आणखी आहेत...