आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US स्ट्राइकमध्ये ISIS कमांडर ठार:राष्ट्राध्यक्ष बायडन यांचा दावा- ISISच्या अबू इब्राहिम अल-हाशिमीचा अमेरिकन सैन्याकडून खात्मा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीरियामध्ये अमेरिकेच्या स्पेशल फोर्सच्या हवाई हल्ल्यावर राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे वक्तव्य आले आहे. बायडन यांच्या मते- हवाई हल्ल्यात इस्लामिक स्टेटचा कमांडर इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरेशी मारला गेला आहे.

सुरुवातीला या हल्ल्यात 13 नागरिक ठार झाल्याची बातमी होती. त्यानंतर बायडन यांचे वक्तव्य आले. पण, न्यूयॉर्क टाइम्स वेगळीच माहिती देत आहे. त्यांच्या अहवालात, त्यांनी बायडन प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा हवाला देऊन दावा केला की, इब्राहिम मारला गेला होता, परंतु तो त्याच्याच बॉम्बचा बळी ठरला आणि यादरम्यान त्याची पत्नी आणि मुलेही मारली गेली.

बायडन काय म्हणाले?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले- आमच्या सैनिकांच्या शौर्याला सलाम. अबू इब्राहिम अल-हाश्मीला आम्ही युद्धभूमीवर ठार केले. तो इसिसचा म्होरक्या होता. ऑपरेशननंतर सर्व अमेरिकन सैनिक सुरक्षितपणे त्यांच्या तळावर परतले.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर सीरियामध्ये करण्यात आलेले हे ऑपरेशन हेलिकॉप्टरने पोहोचलेल्या 24 अमेरिकन कमांडोंनी केले. यावेळी रीपर ड्रोनचाही वापर करण्यात आला. 2019 मध्येही असेच ऑपरेशन करण्यात आले होते. यामध्ये इसिसचा म्होरक्या अबू बकर अल बगदादी मारला गेला.

वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, सीरियात काम करणाऱ्या व्हाईट हेल्मेट्स या नागरी संरक्षण गटाने माहिती दिली आहे की त्यांनी आतापर्यंत 13 मृतदेह घटनास्थळावरून काढले आहेत. यामध्ये 6 मुले आणि 4 महिलांच्या मृतदेहांचा समावेश आहे.

सीरियातील अतमेह गावातील याच घरावर अमेरिकेने हल्ला केला.
सीरियातील अतमेह गावातील याच घरावर अमेरिकेने हल्ला केला.

लोकांना घरे रिकामी करण्यास सांगण्यात आले
न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्स आणि सीरियातील सोशल मीडिया रिपोर्ट्सचे विश्लेषण करणाऱ्या अमेरिकन विश्लेषकांनी सांगितले की, महिला आणि मुलांना लाऊडस्पीकरवर घरे रिकामी करण्यास सांगण्यात आले होते. सुमारे दोन तासांनंतर अमेरिकन कमांडोंनी मोहीम सुरू केली. लष्कराने घरावर ग्रेनेड डागले, त्यानंतर घरात उपस्थित दहशतवाद्यांनी प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी बराच काळ चकमक झाली.

ऑपरेशन दरम्यान, एका अमेरिकन हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे त्याला उतरावे लागले. नंतर अमेरिकन हल्ल्याच्या विमानाने ते नष्ट केले. रात्रीच तिथून अमेरिकन कमांड्स आणि इतर हेलिकॉप्टरने उड्डाण केले.

घराच्या खोल्यांमध्ये विखुरलेल्या वस्तू आणि तुटलेल्या खिडक्या.
घराच्या खोल्यांमध्ये विखुरलेल्या वस्तू आणि तुटलेल्या खिडक्या.
बातम्या आणखी आहेत...