आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीरियाच्या गृहयुद्धाला 12 वर्षे पूर्ण:एकट्या अलेप्पोमध्ये 51 हजार लोक मारले गेले, शहर उद्धवस्त झाली, वाचा- युद्धाविषयी सर्व काही

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कल्पना करा की तुमचा जन्म ज्या शहरात किंवा गावात झाला, जिथे तुम्ही तुमचे बालपण घालवले ते शहरच उद्धवस्त झाले आहे. एकेकाळी बाजारपेठांनी गजबजलेले रस्ते आता युद्धभूमी झाली आहे. आपल्याच प्रियजनांना मारत आहेत. ही परिस्थिती कल्पना केली तर किती भीषण वाटते. पण सीरियातील अलेप्पोमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी ते वास्तव आहे.

मार्च महिन्यात सीरियन युद्धाला 12 वर्ष पूर्ण झाली. गेल्या काही वर्षात एकट्या अलेप्पो शहरात 51,000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अलेप्पो शहरातील 35,000 इमारती उद्ध्वस्त झाल्या. युद्धामुळे सीरियातील 6 युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचे प्रचंड नुकसान झाले.

या युद्धाला 12 वर्षे पूर्ण झाल्यानंतर हे युद्ध का झाले या विषयी या कथेतून जाणून घेऊया..... एवढ्या लोकांना का जीव गमवावा लागला.

सर्वप्रथम जाणून घ्या, युद्धाची परिस्थिती कशी निर्माण झाली?

2011 मध्ये जेव्हा अरब क्रांतीची ठिगणी सीरियात पोहोचली तेव्हा तेथील लोकांनीही बशर-अल-असदच्या हुकूमशाहीविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली. सीरियाच्या डेरा भागात पोलिसांनी काही शाळकरी मुलांना ताब्यात घेतल्यानंतर सरकारविरोधी निदर्शने सुरू झाली, असे अल जझीराच्या वृताने सांगितले होते. याचे एकमेव कारण म्हणजे त्या मुलांनी शाळेच्या भीतींवर बशर-अल-असदच्या विरोधात काही घोषणा दिल्या....!

पोलिसांनी बराच वेळ त्या मुलांना सोडले नाही तेव्हा हजारो लोक शांततापूर्ण निदर्शने करण्यासाठी रस्त्यावर उतरले. 'सेना आणि आम्ही एक आहोत' अशा घोषणा देणाऱ्या लोकांवर लष्कराने गोळीबार सुरू केला. या गोळीबारात सुरुवातीला दोन-तीन जण ठार झाले, मात्र त्यानंतर लोकांमध्ये नाराजी वाढू लागली. सतत निदर्शने करून ते रस्त्यावर उतरू लागले. आता मुद्दा फक्त त्या मुलांचा नव्हता तर तो लोकांच्या हक्काचा होता. हळुहळू, निदर्शने देइरापासून दमास्कस, होम्स, हाना, लताकिया, बनियासपर्यंत पसरली आणि 2012 मध्ये अलेप्पो शहरात आली.

जसजशी निदर्शने वाढत गेली, तसतसा 'बशर-अल-असद' च्या इशाऱ्यावर लष्कराचा अतिरेक झाला. आता लष्कर एक-दोन लोकांना नाही तर प्रत्येक आंदोलकांना लक्ष्य करत होते. लष्कराच्या अतिरेकाला कंटाळून काही आंदोलकांनी लष्कराला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर देत शस्त्र हाती घेतले.

जेव्हा सीरियातील लोकशाहीच्या लढ्याची बातमी बाहेरच्या देशांमध्ये पोहोचली तेव्हा तेथे राहणारे सीरियन नागरिक बंडात भाग घेण्यासाठी सीरियाला परतले. बंडखोरांना शस्त्रांच्या माध्यमातून मदत करू लागले. सरकारविरुद्ध लढणारे बंडखोर लवकरच संघटित झाले आणि फ्री सीरियन आर्मी या नावाने सरकारविरुद्ध लढू लागले.

सीरियाच्या गृहयुद्धात अलेप्पो शहर झाले उद्ध्वस्त
जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक असलेले अलेप्पो शहर. ज्याला 1986 मध्ये युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा प्राप्त झाला होता, ते 2012 पर्यंत सीरियन गृहयुद्धाचे प्रमुख ठिकाण बनले होते. सीरियातील अलेप्पो शहर केवळ जागतिक वारसाच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेचे केंद्र देखील होते, सुंदर मशिदी आणि कलाकृतींनी सजलेले हे शहर आपल्याच लोकांच्या हातून नष्ट झाले.

जुलै 2012 पर्यंत, अलेप्पो दोन भागांमध्ये विभागले गेले होते, एक भाग फ्री सीरियन आर्मीच्या नियंत्रणाखाली आणि दुसरा भाग बशर अल-असदच्या नियंत्रणाखाली होता. ज्या देशांनी सरकारला मदत केली त्यात रशिया, इराण, इराक, अफगाणिस्तान, लेबनॉन आणि पाकिस्तान यांचा समावेश होता. त्याच वेळी बंडखोरांना अमेरिका, सौदी अरेबिया आणि तुर्कियेकडून मदत मिळत होती. सर्व सुंदर कलाकृती, मशिदी आणि सांस्कृतिक वारसा ज्यासाठी हे शहर ओळखले जात होते ते सर्व सरकारी हवाई हल्ल्यात नष्ट झाले.

अलेप्पो शहरात किती बदल झाला
2012 ते 2016 पर्यंत अलेप्पोमध्ये सुमारे 31,183 लोक मारले गेले, ज्यात 22,604 नागरिकांचा समावेश आहे. ज्यांनी फ्री सीरियन आर्मी किंवा बशर अल-असद यांना पाठिंबा दिला नाही. तेथील सांस्कृतिक वारशाबद्दल सांगायचे झाले तर, लढाईमुळे, अलेप्पोची ग्रेट मशीद म्हणून ओळखली जाणारी मशीद ग्रेनेडच्या हवाई हल्ल्यात मोठ्या प्रमाणात नष्ट झाली. UNITAR अहवालानुसार, 210 ज्ञात संरचनांपैकी 22 पूर्णपणे नष्ट झाल्या होत्या आणि 48 गंभीरपणे नुकसान झाल्या होत्या.