आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासीरियाचा रिफ्युजी कँप 'द अल होल'मध्ये 13 वर्षांच्या मुलांना व्हायग्रा दिला जात आहे. सीरिया डिटेंशन कँपमध्ये राहणाऱ्या इसिसच्या महिला असे करत आहेत. मुस्लीम लोकसंख्या वाढवणे हे यामागील कारण असल्याचे सांगितले जात आहे. या महिला मुलांना व्हायग्रा देऊन त्यांच्याशी संबंध ठेवतात.
कँपच्या गार्डकडे मुलांची तक्रार
या प्रकरणाचा खुलासा दोन मुलांच्या तक्रारीनंतर झाला. वास्तविक, कँपमध्ये राहणाऱ्या 13 वर्षीय अहमद आणि 14 वर्षीय हमीदने मदतीसाठी गार्डकडे याचना केली. वृत्तांनुसार दोन्ही मुलांनी गार्डला म्हटले की, 'दहशतवादी महिलांशी संबंध ठेवण्यास आम्हाला बाध्य केले जात आहे. तुम्ही आम्हाला इथून बाहेर काढू शकता का?' अहमद आणि हमीदने अलिकडेच खुल्या ऑर्केश रिहॅब फॅसिलिटीतील कर्मचाऱ्यांना सांगितले की इसिसच्या अनेक महिलांनी त्यांचे लैंगिक शोषण केले. त्यांच्यापैकी एकाला काही दिवसांतच आठ महिलांशी संबंध ठेवण्यास बाध्य करण्यात आले होते. 2019 मध्ये इसिसच्या पराभवानंतर सीरियन सरकारने सुमारे 8000 महिला आणि मुलांना ताब्यात घेतले, जे दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. पुरूष इसिस दहशतवाद्यांना वेगळ्या कँपमध्ये ठेवले जाते.
100 हून अधिक मुली-बालकांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण
अमेरिकेच्या कान्सासमध्ये राहणाऱ्या 42 वर्षीय एलिसन फ्ल्यूक-एकरेन आई असण्यासोबतच शाळेत शिक्षक होती. मात्र नंतर ती इसिसची नेता बनली. एलिसनने 2011 मध्ये दहशतवादी संघटनेसोबत काम करण्यासाठी अमेरिका सोडली आणि आधी लीबिया आइ सीरियात त्यांच्यासोबत काम केले. 2021 मध्ये एलिसन फ्ल्यूक-एकरेनने मान्य केले की तिने सीरियात इसिसच्या महिला मिलिट्री ग्रुपचे नेतृत्व केले होते. आणि ती तिथे शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण द्यायची. एलिसन गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच दोषी आढळली होती आणि तिला 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. एलिसनवर 100 पेक्षा जास्त मुला-मुलींना प्रशिक्षण दिल्याचा आरोप होता. मात्र व्हर्जिनिया कोर्टात एलिसनने आपला गुन्हा कबुल करताना म्हटले की तिने महिला आणि मुलींना प्रशिक्षण दिले आहे, मात्र मुलांना कधीही प्रशिक्षण दिले नाही.
15 वर्षांच्या वयात दहशतवादाचा मार्ग निवडणारी शमीमा बेगम
शमीमा बांग्लादेशी वंशाची ब्रिटिश नागरिक आहे. 2015 मध्ये ती आपल्या दोन मैत्रिणींसह इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी सीरियात गेली. तेव्हा तिचे वय केवळ 15 वर्षे होते. सीरियात गेल्यानंतर इतर दोन मुलींविषयी काहीही कळू शकले नाही. तर शमीमाने तुर्कीत पोहोचल्याच्या 10 दिवसांनंतर डच दहशतवाद्याशी विवाह केला. शमीमावर आरोप आहे की ती आत्मघाती हल्लेखोरांसाठी जॅकेट बनवण्यात निष्णात आहे. मात्र तिने हे आरोप फेटाळले आहेत. 2019 मध्ये ती इसिस सोडून अल हॉल रिफ्युजी कँपमध्ये राहायला लागली. तेव्हा ती तिसऱ्यांदा आई होणार होती. ती आधीही दोन वेळा आई बनली होती, मात्र तिचे एकही अपत्य आज जिवंत नाही. शमीमाने एका मुलाखतीत सांगितले की तिची चूक एवढीच आहे की तिने दहशतवाद्याशी लग्न केले. याशिवाय तिने दुसरे चुकीचे काम केले नाही.
ही बातमीही वाचा...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.