आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबई दहशतवादी हल्ला:कटात सहभागी असलेल्या पाकिस्तानी वंशाच्या तहव्वुर राणाला अमेरिकेत अटक, भारताने केली होती प्रत्यर्पणाची मागणी 

लॉस एंजिल्स2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राणा पहिल्यापासूनच तुरुंगात होता, कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे काही दिवसांपूर्वीच सुटला होता
  • भारताने त्याच्या प्रत्यर्पणाची मागणी केल्यानंतर त्याला पुन्हा अटक करण्यात आली

12 वर्षांपूर्वी मुंबईत दहशतवादी हल्ल्याच्या कटात सामील असलेल्या पाकिस्तानी वंशाच्या तहव्वुर राणा (59)) ला अमेरिकेच्या लॉस एंजिल्समध्ये पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. लष्कर-ए-तोयबाला मदत करणारा राणा गेल्या आठवड्यातच तुरूंगातून सुटला होता. त्याला शिकागोमध्ये 14 वर्षांची तुरुंगवाची शिक्षा झाली होती. परंतु कोरोना पॉझिटिव्ह व ढासळत्या आरोग्याच्या कारणावरून शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच त्याची सुटका करण्यात आली होती. त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी भारताने केली होती. म्हणून त्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे. 

अमेरिका कोर्टाच्या कागदपत्रांनुसार, राणाचे प्रत्यर्पण हे हत्या आणि एका हत्येच्या कटात सामील असल्याच्या आधारावर करण्यात आले आहे. कारण अमेरिकेत एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा होऊ शकत नाही.

पुढील सुनावणी 30 जून रोजी

भारत प्रत्यर्पण प्रकरणात 11 जूनला राणाची कोर्टात पहिल्यांदाच सुनावणी झाली होती.  शुक्रवारी कोर्टाने सांगितले की, पुढील सुनावणी 30 जून रोजी होणार आहे. राणाच्या वकिलाला 22 जूनपर्यंत जामीन अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. कोर्टाने 26 जूनपर्यंत अमेरिकन सरकारकडे जाब मागितला आहे.

26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात 166 लोकांचा बळी गेला होता 

26 नोव्हेंबर 2008 रोजी, लष्कर-ए-तोयबाच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईत हल्ले केले होते. त्या हल्ल्यात 166 लोक ठार आणि 300 जखमी झाले होते. मृत्यू झालेल्यांमध्ये काही अमेरिकन नागरिकही होते. चकमकीत पोलिसांनी 9 दहशतवाद्यांना ठार मारले आणि अजमल कसाबला अटक केली. त्याला 2012 मध्ये फाशी देण्यात आली होती.

2006 ते 2008 या काळात रचले षडयंत्र

राणाविरूद्ध ऑगस्ट 2018 मध्ये राष्ट्रीय अन्वेषण संस्थेच्या विशेष कोर्टाने अटक वॉरंटही जारी केले होते. वकिलांच्या म्हणण्यानुसार, राणा हा त्याचा बालपणातील मित्र डेव्हिड कोलमन हेडलीसोबत मुंबई हल्ल्याच्या कटात सामील होता. पाकिस्तानात 2006 ते 2008 या काळात हे षडयंत्र रचण्यात आले होते. यावेळी राणाने लष्कर-ए-तोयबाला मदत मागितली होती. 

0