आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टक्कर:तैवान प्रकरण : अमेरिका-चीनमध्ये युद्धाची शक्यता, जगाच्या अर्थव्यवस्थेला धक्का; चीनच्या लष्करी सामर्थ्यामुळे सध्याची स्थिती संपण्याचा धोका वाढताेय

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीनला तैवान ताब्यात घेण्यापासून खूप दीर्घकाळपर्यंत आपण रोखू शकत नाही, अशी अमेरिकेला भीती आहे.

गेल्या अनेक दशकांपासून तैवानप्रकरणी अमेरिका व चीनमध्ये अनेक विरोधाभास असतानाही शांतता आहे. चिनी नेते म्हणतात, केवळ एकच चीन आहे. त्यावर त्यांचे शासन आहे. तैवान त्यांचा बंडखोर भाग आहे. अमेरिकेलाही एकच चीन मान्य आहे. पण, त्यांनी दोन चीन आहेत याची खात्री करण्यासाठी गेली ७० वर्षे घालवली आहेत. आता हा सामरिक विरोधाभास संपण्याची शक्यता बळावली आहे. काही तज्ज्ञांच्या मते, चीन आपल्या लष्करी सामर्थ्याच्या बळावर तैवानवर कब्जा करू शकतो. अशा स्थितीत अमेरिका या युद्धात उडी घेऊ शकतो. या दोन्ही अण्वस्त्रधारी महाशक्तींमध्ये युद्ध झाल्यास जगाच्या अर्थव्यवस्थेला घरघर लागू शकते.

चीनला तैवान ताब्यात घेण्यापासून खूप दीर्घकाळपर्यंत आपण रोखू शकत नाही, अशी अमेरिकेला भीती आहे. इंडो-पॅसिफिक कमांडचे प्रमुख अॅडमिरल फिल डेव्हिसन यांनी मार्चमध्ये अमेरिकन काँग्रेसला सांगितले की, चीन २०२७ पर्यंत तैवानवर हल्ला करू शकतो. या युद्धाचे विनाशकारी परिणाम होतील. चीनपासून १६० किलोमीटर दूर असणारा तैवान सेमीकंडक्टरचा प्रमुख उत्पादक आहे. जगातील ८४ टक्के आधुनिक चिप्स तैवानची कंपनी टीएसएमसी बनवते. टीएसएमसीमध्ये उत्पादन थांबल्यास जगभरातील इलेक्ट्रॉनिक्स उद्योग ठप्प होऊ शकतो. या आधुनिक चिप कारपासून ते अनेक प्रकारच्या उद्योगांत उपयोगी पडतात. ही कंपनी तंत्रज्ञानाबाबत इतर स्पर्धक कंपन्यांपेक्षा दहा वर्षे पुढे आहे. अमेरिका आणि चीनला त्यांची बरोबरी करण्यासाठी अनेक वर्षे लागतील. तैवानवरून चीन -अमेरिका दरम्यान दीर्घकाळापासून धुसफूस सुरू आहे. तैवानचे विलीनीकरण करणे हे चीनच्या कम्युनिस्ट सरकारला त्यांचे कर्तव्य वाटते. त्यासाठी हल्ला करण्यासही ते मागेपुढे पाहणार नाहीत. खरे तर अमेरिका तैवानच्या सुरक्षेसाठी बांधील नाही. मात्र, चीनचा हल्ला अमेरिकेचे लष्करी सामर्थ्य आणि त्यांच्या कूटनीतिक, राजकीय संकल्पाची परीक्षा ठरेल.

बातम्या आणखी आहेत...