आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • China Tainwan Update | China Tainawan Latest Update | Taiwan Has 1.34 Lakh Crore Arsenal Ready, 855 Crore Defense Deal With US

देश लहान-ताकद मोठी:तैवानकडे 1.34 लाख कोटींचे शस्त्रागार सज्ज, अमेरिकेसोबत 855 कोटींचा संरक्षण सौदा; नाकेबंदी करण्यास सुरुवात

नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्व आशियाचा समुद्र तापू लागला आहे. चिनी ड्रॅगनने लहानसा शेजारी देश तैवानची नाकेबंदी करण्यास सुरुवात केली. चीनने तैवानच्या सागरी क्षेत्रात सर्वात मोठ्या वॉरगेमला सुरुवात केली. अमेरिकेतील संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या दौऱ्यानंतर राजकीय पारा वाढू लागला आहे. युद्धाचे ढग जमू लागले आहेत. ड्रॅगनच्या मनसुब्यांना ओळखून तैवानने आपल्या सुरक्षेसाठी अमेरिकन शस्त्रास्त्रांचे १.३४ लाख कोटींचे शस्त्रागार सज्ज ठेवले आहे. फेब्रुवारीत रशिया-युक्रेनच्या युद्धानंतर तैवानने आपल्या तयारीला देखील वेग आणला होता. हवाई सीमेचे उल्लंघन करणाऱ्या चिनी विमानांपासून संरक्षणासाठी तैवानने जुलैमध्येच अमेरिकेशी ८५५ कोटी रुपयांचा सौदा केला. तैवानकडे घातक शस्त्रे आहेत. शेंग-फेंग-३. हे सुपरसॉनिक अँटिशिप मिसाइल तैवानचे मोठे संरक्षण कवच आहे. तैवानने त्याला किलर वाॅर कॅरिअर शिप तुओ शिंग क्लासमध्ये तैनात आहे. २०१५ मध्ये तैवानच्या नौदलात सामील तुओ शिंगवर तैनात दोन हजार नौदल सीमेवरून गस्त घालतात.

चीन आधी क्षेपणास्त्र हल्ला करेल, नंतर कूच तैवानी नौदलाचे माजी अॅडमिरल ली साई मिन व माजी अॅडमिरल एरिक ली यांनी एक दावा केला आहे. चीनचे अनेक दशकांपासून तैवानवर ताबा मिळवण्याचे मनसुबे आहेत. म्हणूनच तैवानने चीनचा सामना करण्यासाठी गेल्या दहा वर्षांत आपले सैन्य मजबूत करण्यास सुरुवात केली. त्यानंतरच जलमार्गे हल्ल्याचा प्रयत्न होईल. सर्वात शेवटी लष्कर मैदानात उतरवेल.

६४ हजार कोटींचे ६६ लढाऊ जेट -ातैवानने २०१९ मध्ये अमेरिकेकडून ६४ हजार कोटी रुपयांचे ६६ एफ-१६ लढाऊ जेटचा जगातील सर्वात मोठा खरेदी सौदा केला होता. -तैवानची लोकसंख्या अडीच कोटी आहे. चीनच्या १४० कोटी लोकसंख्येच्या तुलनेत १.७९ टक्के आहे. संरक्षण बजेट ७ टक्के आहे. -१९५४, १९५८, १९९५ मध्ये चीनने तैवानच्या जलक्षेत्रात घुसखोरीचे प्रयत्न केले. परंतु चीनला माघार घ्यावी लागली होती.

युक्रेन पार्ट-२? तशी शक्यता कमी, कारण अमेरिकेची पूर्वीपासून मदत

युक्रेनमध्ये जमिनीवरून हल्ला, तैवानला सागरी सुरक्षा महत्त्वाची रशिया व युक्रेनच्या सीमा भूमार्गे जोडलेल्या आहेत. रशियाने हल्ला करताना आधी पूर्वेकडील डोनबास व डोनेत्समध्ये पायदळ सैन्य पाठवले होते. चीन व तैवानमध्ये अशी सीमा नाही. तैवानकडे युक्रेनच्या तुलनेत तगडे नौदल आहे.

युक्रेनला नाटो देशांकडून मदत, तैवान लष्करदृष्ट्या बळकट तैवानला आधीपासूनच अमेरिकेसह पश्चिमेकडील देशांची मदत मिळते. १९५४ नंतर अमेरिकेने तैवानला ५४ लाख कोटी रुपयांचा शस्त्रास्त्र पुरवठा केला आहे. जर्मनी, फ्रान्समधून १५ लाख कोटी रुपयांची शस्त्रे मिळाली.

गेमचेंजर हिमार क्षेपणास्त्र प्रणाली, पॅट्रियट क्षेपणास्त्रांचे कवच अमेरिकन गेम चेंजर हमार क्षेपणास्त्र प्रणाली तैवानकडे २०१९ पासून आहे. हिमारची एअर डिफेन्स शिल्ड तैवानला अचूक अशा प्रकारची सुरक्षा प्रदान करते. सोबतच पॅट्रियट क्षेपणास्त्रांची संख्याही मोठी आहे. चीनच्या हवाई हल्ल्याचा बिमोड करण्याची तैवानकडे क्षमता आहे.

मोठा अडथळा: चीनला १३० किमीची सागरी सीमा ओलांडावी लागेल सक्रिय दल 20,35,000 1,70,000 पायदळ 9,65,000 94,000 नौदल सैनिक 2,60,000 40,000 हवाई दल 3,95,000 35,000 राखीव दल 5,10,000 16,57,000 मेन बॅटल टँक 5,400 1,110 लढाऊ विमाने 3,277 741 युद्धनौका 59 4 नौदल जहाज 86 26 शस्त्रास्त्रे 9,834 2,093

बातम्या आणखी आहेत...