आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

तायवान-चीन तणाव:मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा- तायवानने आपल्या देशात घुसखोरी केल्यामुळे चीनचे सुखोई फायटर जेट पाडले

तायपेई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • साउथ चाइना सी वरुन तायवान आणि चीनमध्ये वाद सुरू आहे, अमेरिका याप्रकरणी तायवानसोबत आहे

मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात येत आहे की, तायवानने आपल्या सीमेत घुसखोरी करणाऱ्या चीनच्या सुखोई एअरक्राफ्टला हाणुन पाडले आहे. क्रॅश झालेल्या विमानाचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. परंतू, अद्याप दोन्ही देशांकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

चीन मागील अनेक महिन्यांपासून तायवानच्या जल आणि वायु सीमेचे उल्लंघन करत धमकावन्याचा प्रयत्न करत आहे. गुरुवारीदेखील चीनचे एक फायटर जेट जायवानच्या हवाई सीमेत घुसले होते.

अमेरिकन मिसाइलचा वापर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तायवानने चीनचे सुखोई विमान पाडण्यासाठी अमेरिकन मिसाइलचा वापर केला. परंतू, कोणती मिसाइल आहे, याचा खुलासा झालेला नाही. या घटनेनंतर दोन्ही देशात तणाव वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेने स्पष्टपणे सांगितले की, दक्षिण चीन सागरात चीनच्या धमक्या कामी येणार नाहीत. अमेरिका या क्षेत्रातील सर्व लहान देशांसोबत आहे.