• Home
  • International
  • TAK 888, a drug made from the antibodies of a cured patient, will be effective in defense, will also eliminate the virus

कोरोनावर उपचारः बरे झालेल्या रुग्णांच्या अँटीबॉडीने बनवलेले औषध TAK 888 नष्ट करेल कोरोना व्हायरस! जपानचा दावा

  • जपानी कंपनी टाकेडा फार्माचा दावा- ब्लड प्लाझमाने बनवलेल्या औषधींनी कोरोनावर कायमचे उपचार

दिव्य मराठी वेब टीम

Mar 24,2020 11:47:00 AM IST

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी जगभरात औषध आणि लस बनवण्याचे काम सुरू आहेत. अमेरिकेने लस बनवून त्याच्या चाचण्या देखील सुरू केल्या. परंतु, जपानी औषध कंपनी टाकेडा फार्मा वेगळेच प्रयत्न करत आहे. या कंपनीने कोरोनापासून बरे झालेल्या लोकांच्या रक्तातील अँटीबॉडीजने औषध बनवण्याचे काम सुरू केले आहे. कोरोनावर उपचार करण्यासाठी हे औषध अतिशय उपयोगी ठरेल असा कंपनीचा दावा आहे. रुग्णांच्या शरीरातून अँटीबॉडीज कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये पोहोचणार आणि त्यांच्या रोगप्रतिकार क्षमतेत झपाट्याने सुधारणा करून रोग बरे करणार असेही कंपनीने म्हटले आहे.


कसे काम करणार हे औषध?

कोरोना व्हायरसपासून नुकतेच बरे झालेल्या लोकांच्या शरीरात असलेली रोगप्रतिकार व्यवस्था कायमस्वरुपी असे अँटीबॉडी बनवत असते. या अँटीबॉडीज त्यांच्या रक्तात असतात. याचे औषधीत रुपांतर करण्यासाठी रक्तातून ब्लड प्लाझमा वेगळे केले जातात आणि त्यानंतर यातून अँटीबॉडीज काढल्या जातात. याच अँटीबॉडीज नवीन रुग्णांच्या शरीरात विशेष उपचार पद्धतीने इंजेक्ट केल्या जातात. याला वैद्यकीय भाषेत प्लाझमा डिराइव्ह्ड थेरेपी असे म्हटले जाते.


औषधीवर काय म्हणाले जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी?

जोपर्यंत रुग्णाचे शरीर स्वतःहून अँटीबॉडीज तयार करत नाही तोपर्यंत प्लाझमा डिराइव्ह्ड थेरेपी पद्धतीने शरीरात सोडलेले अँटीबॉडीज रोगांशी सातत्याने लढत राहणार आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्लूएचओ) चे आपातकालीन योजना प्रमुख माइक रियान यांनी सांगितल्याप्रमाणे, "कोरोना उपचारावर ही उपचाराची अतिशय प्रभावी पद्धत आहे. रुग्णांना हे उपचार वेळेवर मिळायला हवे जेणेकरून त्यांच्या शरीरातील कोरोनाशी लढण्याची क्षमता वाढले. तरीही अशा प्रकारचे उपचार नेहमीच यशस्वी होत नाही. त्यामुळे, आवश्यक ती काळजी घ्यायला हवी."


चीनमध्ये सुद्धा तयारी

चीनमध्ये फेब्रुवारीत डॉक्टरांच्या एका टीमने कोरोना व्हायरसच्या नवीन रुग्णांना टॅग केले होते. मेयो क्लिनिकचे संक्रमण रोग तज्ज्ञ ग्रेग पोलंड यांच्या मते, चीनमध्ये याची सुरुवात झाल्याची माहिती मिळाली आहे. परंतु, त्या प्रयोगाचे जरनल अजुनही प्रसिद्ध झाले नाही. त्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत.

X