आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधनातून अभ्यासाची प्रभावी पद्धत समोर:लेक्चरच्या पीपीटीचे छायाचित्र काढून ठेवा, अभ्यास लक्षात राहण्यास मदत!

वाॅशिंग्टन10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अध्ययन कक्षेत तंत्रज्ञानाचा चांगला वापर करण्यासाठी अमेरिकेत अलीकडेच एक संशोधन करण्यात आले. या अध्ययनानुसार ऑनलाइन किंवा ऑफलाइन वर्गात शिक्षक पीपीटीद्वारे शिकवत असताना स्लाइडची छायाचित्रे काढून घ्यावीत. त्यामुळे माहिती लक्षात ठेवण्यासाठी मदत होऊ शकते.नोट्स काढण्याचा तुमचा वेग मंद असो किंवा श्रवणासाठी वेळ देण्याची तुमची तयारी असो, याचा काहीही परिणाम होत नाही. सध्या तरी जास्तीत जास्त विद्यार्थी शिक्षक शिकवत असताना पीपीटीच्या स्लाइडचे फाेटो जवळ बाळगणे पसंत करतात. त्याचा अभ्यासासाठी उपयोग करण्याची सवय त्यांना लागली आहे. काहींना असे फोटो काढणे निरुपयोगी वाटू शकते. काहींना आळसही येऊ शकतो. कारण यापैकी काही काढलेले फोटो पुन्हा बघतही नाहीत. फोटो काढल्यामुळे विद्यार्थ्यांना स्लाइड व तोंडी शिकवलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी मदत होते. कॅलिफोर्निया विद्यापीठातील अॅनी डिट्टा म्हणाल्या, फोटो घेतल्याने मेमरी रिटेन्शनसाठी मदत होते. दुसरे म्हणजे फोटो काढताना आशय जास्त लक्षपूर्वक पाहिला जातो.

प्रयोगासाठी दोन अध्ययन, सर्वांना ६० प्रश्न प्रयोगात विद्यार्थ्यांना स्लाइड लक्षात ठेवण्यास सांगितले गेले. इतर विद्यार्थ्यांना वर्गातील व्याख्यानातील पीपीटीच्या स्लाइडचा फोटो काढण्यास सांगण्यात आले. ६० प्रश्न विचारण्यात आले. त्याची सर्वाधिक उत्तरे फोटो काढणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...