आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मलेशियाने कोरोना पसरण्याच्या भीतीने बांगलादेशातून आलेल्या रोहिंग्यांना परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या ३०० शरणार्थींना परत घेऊन जाण्याचे बांगलादेशला सांगण्यात येणार आहे. हे रोहिंग्या फेब्रुवारीत बांगलादेशातून निघाले होते. अनेक महिने समुद्रात प्रवास केल्यानंतर त्यांना दोन दिवसांपूर्वी मलेशियाच्या लँगकावी बेटावर ताब्यात घेण्यात आले. शेकडो रोहिंग्याही निघाले होते, पण त्यांची माहिती नाही. मलेशियाच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, ते येथे थांबू शकत नाहीत, याची रोहिंग्यांना माहीती हवे. दरम्यान, बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री अब्दुल मोमेन यांनी म्हटले आहे की, आम्ही रोहिंग्यांना परत घेण्यासाठी बाध्य नाही. त्यांना ठेवण्याच्या स्थितीत नाही. मलेशियाने कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. देशात कोरोनाचे सुमारे ८ हजार रुग्ण आहेत, तर आतापर्यंत ११८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे रोहिंग्यांना आश्रय देऊन सरकारला कोणतीही जोखीम घ्यायची नाही. आरोग्यतज्ञही इशारा देतात की रोहिंग्यांसारख्या दाट वस्तीत कोरोना पसरणे गंभीर होऊ शकते.
यूएननुसार मलेशियात ९० हजार रोहिंग्या : यूएन मानवाधिकार संघटनेच्या फेब्रुवारीतील अहवालानुसार मलेशियात सुमारे १.८ लाख शरणार्थी आहेत. २०१७ मध्ये म्यानमारमधून नरसंहार आणि लष्करी अत्याचारास कंटाळून ७.३ लाख रोहिंग्यांनी देश सोडला होता. याआधीही लाखोंनी पलायन केले होते. बांगलादेशातील शिबिरांत सुमारे १० लाख रोहिंग्या राहतात.
ब्रिटन : प्राथमिक शाळा उघडण्याच्या निर्णयापासून मागे हटले सरकार
इंग्लंड सरकार प्राथमिक शाळा उघडण्याच्या निर्णयापासून मागे हटले आहे. तर रिटेल स्टोअर आणि प्राणिसंग्रहालय १५ जूनपासून उघडण्याची अपेक्षा आहे. सरकारचा हेतू जुलैत उन्हाळ्याची सुटी सुरू होण्याच्या कमीत कमी चार आठवडे आधी प्राथमिक शाळा सुरू करायचा होता. मात्र आता असे न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षणमंत्री गेव्हिन विल्यम्सन यांनी सांगितले की, आम्हाला वाटते की, सतर्क, टप्प्याटप्प्याने परतणे चांगले पाऊल आहे, जे टाकता येईल. उन्हाळ्याआधी पूर्ण महिन्यासाठी सर्व प्राथमिक शाळेच्या मुलांवर लक्ष देणे शक्य नाही. यामुळे पुढील टप्प्यात यावर काम करता येईल.
अमेरिका : वरिष्ठ तज्ञ फॉसी म्हणाले- कोरोना व्हायरस सर्वात वाईट स्वप्न
वॉशिंग्टन : अमेरिकेचे संसर्गजन्य आजाराचे तज्ञ डॉ. अँथनी फाॅसी यांनी इशारा दिला की, महामारी अजूनही संपलेली नाही. हे वाईट स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विषाणूने चार महिन्यांत पूर्ण जगाला हादरा दिल्याचे म्हटले आहे. त्याने खूप कमी वेळात लाखो लोक बाधित झाले. बाधितांनी जगभरात प्रवास केल्याने तो आणखी पसरला. फॉसी यांनी सांगितले की, अशी महामारी येईल याचा अंदाज आम्हाला होता. मात्र, एवढ्या लवकर जग तावडीत येईल याची कल्पना केली नव्हती. फॉसी यांच्यानुसार अजूनही पूर्णपणे समजले नाही की विषाणू शरीरावर कसा हल्ला करतो आणि गंभीर बाधित पूर्णपणे कसा बरा होईल.
चीन: परदेशात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना लस टोचली जाणार
बीजिंग : चीनच्या काही मोठ्या राज्यात काम करणाऱ्या कंपन्या विदेशात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देणार. यातून हे स्पष्ट होते की, चीन लस बाबत चाचणीच्या खूप पुढे गेला आहे. कामासाठी विदेशात जाण्यास इच्छुक लोकांना चायना नॅशनल बायोटिक ग्रुपद्वारा (सीएनबीजी) तयार लस दिली जाईल. सीएनबीजी त्या कंपन्यांपैकी एक आहे ज्यांनी लस बनवण्यात यश आल्याचा दावा केला आहे. दरम्यान, चीनच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने संशोधनाद्वारे इशारा दिला आहे. यात म्हटले आहे की, चीनला या जागतिक महामारीच्या दुसऱ्या टप्प्याचा सामना करावा लागू शकतो. सेंटरचे संचालक जीयू फू यांनी सांगितले की, चिनी नागरिक अजूनही धोक्यात आहेत. कारण चीनसह पूर्ण जगात प्रकरणे वेगाने वाढत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.