आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘स्वयंपाकघरात पाऊल ठेवताच माझ्यात ऊर्जा संचारते. किचन हाताळताना आयुष्यही नियंत्रणात वाटते..’ अशी भावना अमेरिकेतील नागरिकांना भारतीय खाद्यपदार्थांची आेळख करून देणारे प्रख्यात शेफ राघवन अय्यर यांनी एका मुलाखतीत व्यक्त केली होती. कर्करोगामुळे त्यांचे ६१ व्या वर्षी निधन झाले. मुंबईत जन्मलेले अय्यर २१ व्या वर्षी अमेरिकेत गेले तेव्हा त्यांना बटाट्याची भाजीही येत नव्हती. पुढे ते पाककलेत निपुण झाले. खाद्यपदार्थांची सात पुस्तकेही त्यांनी लिहिली. त्यांच्या प्रेरक प्रवासाबद्दल जाणून घेऊया.....
किमोथेरपी सत्रादरम्यान करीवर पुस्तक लेखन, त्यास ‘ अ लव्ह लेटर टू दर करी वर्ल्ड’ असे संबोधले
रसायनशास्त्रातील पदवीनंतर राघवन अय्यर संभ्रमात होते. नंतर मुंबईतील अमेरिकन राजदूत कार्यालयात त्यांनी कोर्सची माहिती घेतली. मिनिसोटामध्ये हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट प्रोग्राम निवडला. १९८२ मध्ये अमेरिकेत गेल्यावर दक्षिण भारतीय खाद्यपदार्थासारखे काहीही नव्हते. मग दुकानातून करी पावडर घेऊन बटाट्याची भाजी केली. ती एवढी वाईट झाली की त्यांना स्वत:वर रडू आले. परंतु ६ भाषांचे जाणकार अय्यर यांनी हार मानली नाही. त्यांनी भारतात असलेल्या आई-बहिणीला रेसिपीबद्दल विचारले. नवीन मित्रांकडून पदार्थ बनवण्याच्या टिप्स घेतल्या. नंतर हा त्यांच्यासाठी प्रयोग झाला. पुढे शिकवण्यास सुरुवात केली. त्यांनी लेखनाव्यतिरिक्त असंख्य फूड वर्कशॉप, शेफच्या प्रशिक्षणासाठी विद्यापीठ, संग्रहालय, गुगलसारख्या कंपन्यांच्या मेन्यूला भारतीय मसाले आणि फ्रोझन फूडने समृद्ध केले. त्यांची पद्धत अतिशय साधी-सोपी होती. जिन्नसही सहज उपलब्ध होतील अशा आहेत. त्यांचे पहिली पुस्तक ‘बेट्टी क्राॅकर्स इंडियन होम कुकिंग’ २००१ मध्ये बाजारात आले होते. अमेरिकेत राघवन यांच्यासोबत पहिल्या दिवसापासून सोबत राहिलेले अॅरिक्सन म्हणाले, १८ वर्षे झुंज दिल्यानंतर अय्यर यांना याच पुस्तकामुळे अमेरिकन नागरिकत्व मिळाले. याच ब्रँडमुळे अय्यर यांना प्रकाशकांसाठी भारतीय खाद्यपदार्थ करण्याची संधी मिळाली. कुकरी बुक लेखक निक शर्मा आजही अय्यर यांच्या सर्वाधिक यशस्वी ‘६६० करीज : द गेटवे टू वर्ल्ड ऑफ इंडियन कुकिंग’ पुस्तकाची मदत घेतात. अखेरचे पुस्तक ‘ऑन द करी ट्रेल : चेंजिंग द फ्लेवर दॅट सेड्यूस्ड द वर्ल्ड’ तर त्यांनी किमो सुरू असताना लिहिले. हे पुस्तक म्हणजे ‘कढीच्या विश्वाला लिहिलेले प्रेमपत्र’ असे त्यांनी म्हटले होते. त्यात कढीचा प्रवास मांडला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.