आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषिक मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे जगभर तीव्र पडसाद उमटलेत. विशेषतः मुस्लि राष्ट्रांनी या प्रकरणी भारतापुढे तीव्र विरोध नोंदवला आहे. त्यात आता अफगाणिस्तानातील कट्टरपंथी तालिबानचीही भर पडली आहे. तालिबानने भारताला चक्क अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्याचा सल्ला दिला आहे.
तालिबानने म्हटले आहे की, भारत सरकारने कट्टपंथीयांना इस्लामचा अवमान करण्यापासून व मुस्लिमांच्या भावनांना हात घालण्यापासून रोखले पाहिजे. तालिबानी प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद म्हणाले -'भारताच्या सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याने मोहम्मद पैगंबरांविषयी अवमानास्पद शब्दांचा वापर केला आहे. अफगाणचे इस्लामिक अमिरात याचा तीव्र निषेध करते.'
UN ने म्हटले -सर्वच धर्मांसाठी सन्मान व सहिष्णुता हवी
इस्लामिक देशांनी या प्रकरणी भारतावर चौफेर टीका केल्यानंतर संयुक्त राष्ट्रानेही निवेदन जारी केले आहे. युनोचे सरचिटीस अँटोनियो गुटारेस यांचे प्रवक्ते म्हणाले -'मी स्वतः विधान ऐकले नाही. पण, त्याविषयीच्या बातम्या पाहिल्यात. त्यामुळे सर्वांनी सर्वच धर्मांप्रती सन्मान व सहिष्णुता बाळगावी असे मी सांगू शकतो.'
14 देशांनी केला विधानाचा निषेध
आतापर्यंत जगभरातील 14 देशांनी नुपूर शर्मा यांच्या विधानाचा निषेध केला आहे. या देशांत इराण, इराक, कुवैत, कतार, सौदी अरेबिया, ओमान, संयुक्त अरब अमिरात, जॉर्डन, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बहरिन, मालदिव, लीबिया व इंडोनेशियाचा समावेश आहे. सौदी अरेबिया, कुवैत, बहरिन व अन्य अरब राष्ट्रांनी आपल्या सुपर स्टोअर्समध्ये भारतीय उत्पादनांची विक्री करण्यावरही बंदी घातली आहे.
57 देशांच्या इस्लामिक सहकार्य संघटनेनेही (ओआयसी)याचा निषेध केला आहे. संघटनेने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारतात गत काही दिवसांपासून मुस्लिमांवरील हिंसाचाराच्या घटना वाढल्यात. अनेक राज्यांतील शैक्षणिक संस्थांत हिजाबवर बंदीसह मुस्लिमांवर निर्बंधही लादले जात आहेत.
पाक पंतप्रधान म्हणाले -भाजप नेत्याचे विधान वेदनादायी
पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही नुपूर शर्मा यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. ते म्हणाले -'मी भाजप नेत्याने आमच्या प्रिय प्रेषितांविरोधात केलेल्या त्रासदायक विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करतो. पैगंबरांवर आमचे सर्वाधिक प्रेम आहे. प्रत्येक मुस्लिम त्यांच्यासाठी प्राणाची आहुती देऊ शकतो.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.