आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्फोटानंतर 2 दिवसांनी पुन्हा हादरले विमानतळ:काबूल विमानतळाच्या प्रवेशद्वारावर गोळीबार, अमेरिकेने कालच दिला होता दहशतवादी हल्ल्याचा इशारा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काबूल विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ पुन्हा गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. गोळीबारानंतर येथे गोंधळाचे वातावरण निर्माण आहे. येथे अश्रुधुराच्या नळकंड्याही फोडण्यात आल्या आहेत. रॉयटर्सच्या मते, गोळीबार कोणी केला, हे सध्या स्पष्ट नाही. यापूर्वी गुरुवारी आत्मघातकी हल्ल्यांमध्ये 170 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये 13 अमेरिकन सैनिकही मारले गेले.

अमेरिकेने दिला होता हल्ल्यांचा अलर्ट

अमेरिकेने काबूल विमानतळावर आणखी दहशतवादी हल्ल्याचा इशारा एक दिवसापूर्वीच जारी केला होता. अमेरिकेने आपल्या नागरिकांना ताबडतोब काबूल विमानतळावरून माघार घेण्यास सांगितले आहे, कारण ISIS तेथे पुन्हा हल्ला करू शकते. अमेरिकन दूतावासाने जारी केलेल्या अलर्टमध्ये काबुल विमानतळाच्या अबे गेट, पूर्व गेट आणि उत्तर गेटचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.

अमेरिकेने सांगितले - मिशन काबुलचे पुढील काही दिवस सर्वात धोकादायक असतील
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या राष्ट्रीय सुरक्षा पथकाने इशारा दिला आहे की अमेरिकन सैन्यानी काबूल सोडले तर पुन्हा दहशतवादी हल्ले करू शकतात. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी जेन सासाकी यांनी सांगितले की, काबुल विमानतळावर सर्व शक्य सुरक्षा व्यवस्था केली जात आहे. सर्व धोके असताना, आमचे सैनिक लोकांना बाहेर काढण्याच्या मिशनमध्ये गुंतलेले आहेत, परंतु या मिशनचे पुढील काही दिवस सर्वात धोकादायक असतील.

तालिबानने काबूल विमानतळाचा मोठा भाग केला सील
तालिबानने शनिवारी काबूल विमानतळाचा मोठा भाग सील केला आहे. दोन दिवसांपूर्वी विमानतळावर झालेला स्फोट आणि सतत वाढत जाणारी गर्दी पाहता तालिबानने त्यांच्या लढवय्यांची मोठी संख्या येथे तैनात केली. विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर आणि प्रमुख चौकाचौकात अनेक स्तरातील लढाऊ सुरक्षा व्यवस्था पाहत आहेत.

ब्रिटन, जर्मनीसह अनेक देशांचे बचावकार्य थांबवण्यात आले आहे. आता फक्त अमेरिका आणि काही निवडक देश एअरलिफ्टिंग करत आहेत. अमेरिकेने स्पष्टपणे सांगितले आहे की जर 31 ऑगस्टच्या अंतिम मुदतीत बचाव कार्य पूर्ण झाले नाही तर ते आणखी लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू ठेवेल.

बातम्या आणखी आहेत...