आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Taliban Afghanistan Kabul Capture LIVE Update August 17; US Military Withdrawal | Pakistan Imran Khan, Indian Evacuation Latest News

काबूलमधून भारतीयांचे एअरलिफ्ट:भारताने ताबडतोब काबूलचे राजदूत आणि कर्मचाऱ्यांना परत बोलावले; एअर फोर्स ग्लोबमास्टरने 130 भारतीयांसह केले उड्डाण

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानमधील सध्याची परिस्थिती पाहता भारत सरकारने राजदूत रुद्रेंद्र टंडन आणि काबुलमध्ये असलेले त्यांचे भारतीय कर्मचारी परत बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर, भारतीय अधिकारी आणि इतर लोकांनाही विमानाने हलवले जात आहे. हवाई दलाचे ग्लोबमास्टर C -17 विमान 130 पेक्षा जास्त लोकांना घेऊन मंगळवारी सकाळी काबूलहून निघाले. भारतीय राजदूतही त्याच विमानाने येत आहेत. हे विमान दुपारी 1 वाजता जामनगरला पोहोचेल आणि तेथून ते गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर पोहोचणार आहे.

एएनआय वृत्तसंस्थेच्या सूत्र्यांच्या माहितीनुसार, ज्या लोकांना या विमानाने आणले जात आहे, त्यांना सोमवारी संध्याकाळी काबूल विमानतळाच्या सुरक्षित भागात हलवण्यात आले होते. यासह सोमवारी देखील अनेक लोकांना हवाई दलाच्या विमानाने भारतात आणण्यात आले.

तसेच अफगाणिस्तानमध्ये अडकलेले उर्वरित भारतीय सुरक्षित भागात आहेत आणि त्यांना एक-दोन दिवसात विमानानेही आणले जाईल. परराष्ट्र मंत्रालयानेही सोमवारी सांगितले की, ते अफगाणिस्तानमधील घटनेवर बारीक लक्ष ठेवून आहेत. आम्ही आमच्या नागरिकांच्या संरक्षणासाठी प्रत्येक पाऊल उचलू.

आम्हाला माहित आहे की अफगाणिस्तानात काही भारतीय नागरिक आहेत, ज्यांना परत यायचे आहे आणि आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले. आम्ही प्रत्येक भारतीयाला त्वरित भारतात परतण्याचे आवाहन करतो. आम्ही अफगाणिस्तान शीख, हिंदू समाजाच्या प्रतिनिधींच्या सतत संपर्कात आहोत, ज्यांना अफगाणिस्तान सोडायचे आहे त्यांना भारतात आणण्यासाठी पूर्ण सुविधा दिल्या जातील.

गृह मंत्रालयाकडून आपत्कालीन व्हिसा
दरम्यान, अफगाणिस्तानातून भारतात येणाऱ्या लोकांसाठी गृह मंत्रालयाने व्हिसाचे नियम बदलले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता, इलेक्ट्रॉनिक व्हिसा ई-इमर्जन्सी एक्स-मिस्क व्हिसाची नवीन श्रेणी सुरू करण्यात आली आहे. अफगाणिस्तानातून भारतात येणाऱ्या लोकांना लवकरात लवकर व्हिसा मिळावा म्हणून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...