आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Taliban Afghanistan Kabul Capture LIVE Update; US Military Withdrawal | Pakistan Imran Khan, Indian Evacuation Latest News

काबूल विमानतळावर 2 भीषण बॉम्बस्फोट:12 अमेरिकी कमांडोंसह 80 ठार, ISIS-K ने स्वीकारली स्फोटाची जबाबदारी, अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले- हल्लेखोरांना शोधून ठार मारू

काबुल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर गुरुवारी संध्याकाळी दोन आत्मघाती हल्ले झाले. 'वॉल स्ट्रीट जर्नल' या अमेरिकन वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 80 जण ठार झाले आहेत तर 200 हून अधिक जखमी झाले आहेत. वृत्तसंस्थेनुसार, इसिस या दहशतवादी संघटनेच्या खुरासान गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. यूएस सेंट्रल कमांडचे जनरल केनेथ मॅकेन्झी यांनी सांगितले की, मृतांमध्ये 12 सागरी कमांडोचा समावेश आहे, तर 15 जखमी आहेत. काबूल विमानतळावरून सर्व उड्डाणे ऑपरेशन स्थगित करण्यात आली आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी 3 स्फोट झाल्याचे वृत्त आहे. हे विमानतळाजवळच घडले, असे म्हणता येणार नाही. दारुलमन परिसरातही जोरदार गोळीबार झाल्याची माहिती आहे.

अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या पेंटागॉनने सांगितले - गुरुवारी पहिला स्फोट हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अबे गेटवर झाला. थोड्याच वेळात, विमानतळाजवळील बॅरॉन हॉटेलजवळ दुसरा स्फोट झाला. ब्रिटिश सैनिक इथेच थांबले होते. तीन संशयित विमानतळाबाहेर दिसले. त्यापैकी दोन आत्मघाती हल्लेखोर होते, तर तिसरा बंदूक घेऊन आला होता. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

दोन्हीही अतिरेकी संघटना, आयसिल-केपी जास्त धोकादायक
- अफगाणिस्तानात आयसिल-केपीचेही चांगलेच बस्तान आहे. अनेक प्रांतांत तालिबानी कर वसूल करतात व आयसिल-केपीही वाटा मागते. दशकभरात दोन्हीही अतिरेकी संघटनांनी एकमेकांवर शेकडो हल्ले केले आहेत.

- वाटा हे भांडणाचे मूळ कारण आहे. तालिबान सत्तेत आहेत. यामुळे आयसिल-केपी त्यांच्याशी लढून संघटना शाबूत ठेवू पाहत आहे. तालिबानी हे अमेरिकेच्याच हातचे बाहुले असल्याचे आयसिल-केपीने २ दिवसांपूर्वीच म्हटले हाेते.

- तालिबानशी समझोत्यानंतर अमेरिकी लष्कराने तालिबानवर हल्ले केले नाहीत. उलट आयसिल-केपी आणि इसिससारख्या संघटनांवर हल्ले करून त्यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. आयसिल हे तालिबानपेक्षा धोकादायक असल्याचे मानले जाते.

अमेरिकेच्या सुरक्षेत आहे काबूल विमानतळ
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी आपत्कालीन बैठक घेतली. इस्रायलचे पीएम बेनेटसोबतची बैठक लांबणीवर टाकली.
- ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांनीही आपत्कालीन बैठक बोलावली.
- फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन म्हणाले, फ्रेंच राजदूत काबूल सोडतील, पॅरिसहून काम करतील. रशियाचे मंत्री म्हणाले, स्थितीवर नजर.
- भारताने दु:ख व्यक्त केले. अतिरेक्यांना आश्रय देणाऱ्यांविरुद्ध एकजुटीचाही केला पुनरुच्चार.

स्फोटानंतर जखमींना ट्रॉलीने रुग्णालयात नेण्यात आले.
स्फोटानंतर जखमींना ट्रॉलीने रुग्णालयात नेण्यात आले.

तालिबानने दिला होता अमेरिकेला इशारा
यापूर्वी तालिबानने अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीत 31 ऑगस्टपर्यंत देश सोडण्याचा इशारा दिला होता. अमेरिकेने ठरवलेल्या कालावधीत देशातून सैन्य मागे घेण्याबाबतही बोलले होते. दरम्यान, आज व्हाईट हाऊसने 31 नंतरही गरज पडल्यास बचाव कार्य राबवण्याची घोषणा केली होती.

बातम्या आणखी आहेत...