आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Taliban Afghanistan Kabul ISI LIVE Update; Panjshir News | Kashmir News | Pakistan | US Military Withdrawal | Afghan President Ashraf Ghani; News And Live Updates

तालिबानी राजवट:सरकार स्थापनेसाठी तालिबान आणि हक्कानी नेटवर्कमध्ये संघर्ष, मुल्ला बरादर हक्कानीच्या गोळीबारात जखमी

काबूल19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाकिस्तानला तालिबानी सरकारची कमांड दहशतवाद्यांकडे द्यायची आहे

अफगाणिस्तानात सत्ता स्थापनेवरुन तालिबानी आणि हक्काणी नेटवर्कमध्ये संघर्ष सुरु झाला आहे. तालिबानने काही दिवसांपूर्वी सत्ता स्थापनेचा दावा केला होता. परंतु, या संघर्षामुळे अफगाणिस्तानात सरकार स्थापनेबाबत वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. अफगाणिस्तानातील वृत्तपत्र पंजशीर ऑब्झर्व्हरच्या अहवालानुसार, तालिबानचे सहसंस्थापक मुल्ला बरदार हक्कानी नेटवर्कच्या गोळीबारात जखमी झाले आहेत.

पाकिस्तानला तालिबानी सरकारची कमांड दहशतवाद्यांकडे द्यायची आहे
अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सरकारची घोषणा होण्यापूर्वी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांच्या काबूल दौऱ्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आयएसआय प्रमुख मुल्ला अब्दुल गनी बरदार यांना राष्ट्रपती होण्यापासून रोखण्यासाठी येत आहे. दहशतवादी संघटन हक्काणी नेटवर्ककडे तालिबान सरकारची कमांड सोपवण्यासाठी आयएसआय प्रमुख काबूल दौऱ्यावर येत असल्याचा आरोप अफगाणिस्तानच्या माजी खासदार मरियम सोलेमानखिल यांनी केला आहे.

मुल्ला बरदार कोण आहे?

  • तालिबानचे सह-संस्थापक मुल्ला बरदार हे संघटनेचे क्रमांक दोनचे नेते आहेत. मुल्ला बरदार यांनी 1996 ते 2001 या काळात तालिबान राजवटीत महत्त्वाची भूमिका बजावली. 2001 मध्ये अमेरिकेच्या हल्ल्याच्या वेळी ते अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे संरक्षण मंत्री होते. 2001 नंतर जेव्हा अमेरिकेने अफगाणिस्तानवर कब्जा केला तेव्हा मुल्ला बरादर पाकिस्तानात गेले.
  • पाकिस्तानला विश्वासात न घेता अफगाणिस्तान सरकारशी बोलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाल्यानंतर पाकिस्तानने 2010 मध्ये मुल्ला बरदारला तुरुंगात टाकले. मात्र, नंतर पाकिस्तानने बरादारची सुटका केली.
  • 2018 मध्ये तालिबानने आपले राजकीय कार्यालय दोहा, कतार येथे उघडले. तेथे अमेरिकेबरोबर शांतता चर्चेसाठी गेलेल्या लोकांमध्ये बरादार प्रमुख होता. अमेरिकेबरोबरच्या संवादाला नेहमीच समर्थन दिले आहे.
बातम्या आणखी आहेत...