आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालिबानी राजवट:अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापनेबाबत आज निर्णय होऊ शकला नाही, आता उद्या होऊ शकते मोठी घोषणा

काबुल20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानमध्ये शुक्रवारी सरकार स्थापन होणार होते, परंतु तालिबानच्या शीर्ष नेत्यांनी ते पुढे ढकलले आहे. आता नवीन सरकारच्या स्थापनेबाबत निर्णय उद्या म्हणजेच 4 सप्टेंबर रोजी घेतला जाईल. तालिबानचे प्रवक्ते जबीउल्ला मुजाहिद यांच्या मते, नवीन सरकारच्या स्थापनेची घोषणा आता शनिवारी केली जाईल.

अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारची ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुल्ला बरादर अफगाणिस्तानच्या नवीन सरकारचा कार्यभार सांभाळेल. त्याचबरोबर तालिबान संस्थापक मुल्ला उमरचा मुलगा मुल्ला मोहम्मद याकूब तसेच शेर मोहम्मद अब्बास स्टेनकजईलाही तालिबान सरकारमध्ये महत्त्वाची पदे दिली जातील. हे सर्वजण काबूलला पोहोचले आहेत जिथे नवीन सरकारची घोषणा कधीही होऊ शकते. दैनिक भास्करच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानची खरी सत्ता शूरा समितीच्या हातात राहील.

मुल्ला बरदार कोण आहे?

  • तालिबानचे सह-संस्थापक मुल्ला बरदार हे संघटनेचे क्रमांक दोनचे नेते आहेत. मुल्ला बरदार यांनी 1996 ते 2001 या काळात तालिबान राजवटीत महत्त्वाची भूमिका बजावली. 2001 मध्ये अमेरिकेच्या हल्ल्याच्या वेळी ते अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे संरक्षण मंत्री होते. 2001 नंतर जेव्हा अमेरिकेने अफगाणिस्तानवर कब्जा केला तेव्हा मुल्ला बरादर पाकिस्तानात गेले.
  • पाकिस्तानला विश्वासात न घेता अफगाणिस्तान सरकारशी बोलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाल्यानंतर पाकिस्तानने 2010 मध्ये मुल्ला बरदारला तुरुंगात टाकले. मात्र, नंतर पाकिस्तानने बरादारची सुटका केली.
  • 2018 मध्ये तालिबानने आपले राजकीय कार्यालय दोहा, कतार येथे उघडले. तेथे अमेरिकेबरोबर शांतता चर्चेसाठी गेलेल्या लोकांमध्ये बरादार प्रमुख होता. अमेरिकेबरोबरच्या संवादाला नेहमीच समर्थन दिले आहे.
बातम्या आणखी आहेत...