आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालिबानी राज्य:जलालाबादमध्ये अफगानी झेंडा घेऊन प्रदर्शन करणाऱ्या लोकांवर तालिबान्यांनी झाडल्या गोळ्या, एकाचा मृत्यू

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तान वाचवण्यासाठी तयार केलेल्या फ्रंट नॉर्दन अलायन्सने तालिबानविरुद्ध युद्ध पुकारले आहे. तालिबानच्या राजवटीत पंजशीर खोऱ्यात अफगाणिस्तानचा झेंडा फडकवला गेला. 2001 नंतर पहिल्यांदाच असे घडले आहे. अशी बातमी आहे की, तालिबान्यांपासून वाचण्यासाठी जे अफगाणी सैनिक लपले होते. सध्या ते पंजशीरला पोहोचले आहेत. दिवंगत अफगाणिस्तानचे राजकारणी अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूदच्या आवाहनावर हे सैनिक पंजशीरमध्ये जमले आहेत.

तालिबानला अनेक ठिकाणी सामान्य जनतेच्या विरोधाचाही सामना करावा लागत आहे. अशीच एक घटना जलालाबादमध्ये समोर आली आहे. येथे लोकांनी तालिबान्यांच्या राजवटीमध्ये अफगाणिस्तानचा झेंडा लावला. ज्याला तालिबान्यांनी काढून टाकण्याचा आणि स्वतःचा झेंडा लावण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान, लोक तालिबानशी भिडले आणि लोकांना धमकावण्यासाठी तालिबान्यांनी गोळीबार केला. यामध्ये एक व्यक्ती ठार झाल्याची माहिती आहे.

जलालाबादमध्ये लोक अफगाणिस्तानचा झेंडा घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. अफगाणिस्तानचा सध्याचा ध्वज हा राष्ट्रध्वज म्हणून कायम ठेवावा, अशी त्यांची मागणी आहे. तत्पूर्वी मंगळवारी, पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या खोस्त प्रांतातही लोकांनी अफगाण ध्वजासह निदर्शने केली.

बातम्या आणखी आहेत...