आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालिबानी राजवट:पंजशीरमध्ये सामान्य नागरिकांचे रक्त सांडत आहे तालिबान, आतापर्यंत 20 लोकांची केली हत्या

काबुल13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तालिबानी रस्त्याच्या मधोमध महिलांना मारहाण करत आहेत

अफगाणिस्तानच्या पंजशीर खोऱ्यात तालिबानच्या रेजिस्टेंस फोर्ससोबत युद्ध सुरू आहे. मात्र, तालिबानने दावा केला आहे की त्याने पंजशीर जिंकले आहे. दुसरीकडे, रेजिस्टन्स फोर्सचे म्हणणे आहे की त्याच्याकडे अजूनही 60% पेक्षा जास्त पंजशीर आहेत. दरम्यान, बीबीसीच्या एका अहवालात म्हटले आहे की तालिबान आता पंजशीरमध्ये नागरिकांचे रक्त सांडत आहे आणि आतापर्यंत 20 लोकांचा बळी घेतला आहे.

बीबीसीच्या अहवालानुसार, तालिबानने लक्ष्य केलेल्या 20 लोकांमध्ये एका दुकानदाराचा समावेश होता. तो गरीब दुकानदार आहे आणि त्याचा युद्धाशी काहीही संबंध नाही. स्थानिक लोकांनी सांगितल्यानुसार तालिबानी आल्यानंतरही ती व्यक्ती पळाली नाही, त्याने म्हटले होते की, तो एक गरीबदुकानदार आहे आणि युद्धाशी त्याचे काहीच देणे-घेणे नाही. त्याला तालिबानने रेझिस्टन्स फोर्सच्या सैनिकांना सिम विकल्याबद्दल अटक केली आणि नंतर खून करून मृतदेह त्याच्या घरात टाकून दिला. लोक असेही म्हणतात की शरीरावर जखमांच्या खुणा होत्या.

दोन दिवसांपूर्वीच, पंजशीरचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये तालिबानी एका तरुणाला त्याच्या घराबाहेर फेकताना आणि रस्त्यावर गोळ्या जाडताना दिसत आहेत. अफगाणिस्तानच्या एका न्यूज पोर्टलनुसार, तालिबानने म्हटले होते की, हा तरुण पंजशीरमधील उत्तर आघाडीच्या सैन्याचा सदस्य होता. तथापि, मृताचा आणखी एक साथीदार तालिबानला आपले ओळखपत्र दाखवत राहिला, परंतु ते सहमत झाले नाहीत आणि त्याचा जीव घेतला.

तालिबानी रस्त्याच्या मधोमध महिलांना मारहाण करत आहेत
तालिबान तो बदलला असल्याचे लाखो दावे करेल, परंतु वास्तव हे आहे की तो अजूनही 20 वर्षांपूर्वी सारखाच स्त्रियांविरुद्ध क्रूर आणि अमानुष आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा घेतल्यापासून याचा पुरावा दररोज समोर येत आहे. राजधानी काबूलमध्ये तालिबानींनी एका महिलेला मारहाण केल्याचे आणखी एक चित्र समोर आले आहे. काबूलमधील निदर्शनामध्ये ही महिला सहभागी होती. दरम्यान, तालिबान्यांनी तिला घेरले आणि लाठ्या आणि चाबकांचा पाऊस सुरू केला.

तालिबान सरकारच्या घोषणेपूर्वीच अफगाण महिला त्यांच्या हक्कांसाठी निदर्शने करत आहेत, पण तालिबान त्यांना बंदुकीच्या बळावर दाबण्याचा प्रयत्न करत आहे. तालिबानी सरकारमध्ये एखाद्या महिलेला समाविष्ट करुन घेणे हे तर दूरच, पण महिलांवर अनेक नवीन निर्बंध लादले जात आहेत. यामुळे महिलांची नाराजी वाढत आहे, पण तालिबान त्यांना कधी गोळीबार करून तर कधी लाठीमार करून रोखण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच काय तर गेल्या काही दिवसांपूर्वी, एक फर्मानही काढण्यात आले होते की, निषेधापूर्वी परवानगी घ्यावी लागेल आणि कोणत्या घोषणा दिल्या जातील हे सांगावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...