आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Taliban Afghanistan Kabul LIVE Update; Panjshir News | Pakistan | US Military | Afghan New Government

तालिबानी राजवट:तालिबान्यांनी माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेहच्या भावाची केली निर्घृण हत्या, आधी गळा कापला, नंतर झाडल्या गोळ्या

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालिबानने अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांचे मोठे बंधू रोहुल्लाह सालेह यांची हत्या केली आहे. तालिबानच्या सूत्रांनी दावा केला की रोहुल्लाह सालेह हा पंजशीर खोऱ्यातच मारला गेला. सूत्रांनी सांगितले की, तालिबान्यांनी अत्याचार केल्यानंतर रोहुल्लाह ठार झाला. त्यांना पहिले चाबूक आणि इलेक्ट्रिक वायरने मारहाण करण्यात आली, त्यानंतर त्यांचा गळा कापण्यात आला. नंतर, पीडित सालेहवर गोळ्या झाडण्यात आल्या.

असे सांगितले जात आहे की रोहुल्लाह सालेह पंजशीरहून काबुलला जात होता. तालिबानला याची माहिती मिळाली. त्यांनी सालेहला घेरले आणि त्याला बंदिवासात नेले आणि निर्घृणपणे त्याची हत्या केली. मात्र, खुद्द अमरूल्ला सालेह यांनी या प्रकरणावर आतापर्यंत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

तालिबानने पंजशीरमधील त्या जागेचे छायाचित्रही प्रसिद्ध केले आहे जिथे काही दिवसांपूर्वी माजी राष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी हा व्हिडिओ जारी केला होता. अमरूल्ला सालेहने तालिबानच्या दाव्यांचे खंडन करत एक व्हिडिओ जारी केला, तो म्हणाला की तो पंजशीरमध्ये उपस्थित आहे आणि त्याच्या मृत्यूपर्यंत तिथेच राहील.

माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह (मध्ये) माजी राष्ट्रपती अशरफ गनी यांच्यासोबत.
माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह (मध्ये) माजी राष्ट्रपती अशरफ गनी यांच्यासोबत.

तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यानंतर 15 ऑगस्ट रोजी राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी देश सोडून पळून गेले. यानंतर उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी स्वतःला राष्ट्रपती घोषित केले. त्याचबरोबर त्यांनी, पंजशीरच्या लढवय्यांसह राष्ट्रीय प्रतिरोध दलाच्या बॅनरखाली तालिबानच्या विरोधात रणशिंग फुंकले. तालिबानने काही दिवसांपूर्वी पंजशीर येथे विजयाचा दावा केला होता. त्याने पाकिस्तानी हवाई दलाच्या पाठिंब्याने पंजशीरच्या दोन मोठ्या नेत्यांची हत्या केली होती. तालिबानने नॉर्दर्न अलायन्सचे कमांडर आणि बंडखोर प्रवक्ते फहीम दष्टी आणि जनरल अहमद शाह मसूद यांचा पुतण्या जनरल वदुद यांना ठार केले, जे पंजशीरचे शेर म्हणून ओळखले जातात.

तालिबानच्या क्रौर्याच्याा शिकारीने घेतले 4 जणांचे बळी
अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या विरोधात निदर्शने थांबत नाहीत. अशा स्थितीत तालिबान निषेध दडपण्यासाठी क्रूरता दाखवत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे की, तालिबान शांततेने आंदोलन करणाऱ्या लोकांवर हिंसक पद्धतींचा अवलंब करत आहे, त्यांना शस्त्रे आणि चाबकाने मारहाण केली जात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांच्या मते, तालिबानी क्रूरतेचे चार जण आतापर्यंत मरण पावले आहेत.

संयुक्त राष्ट्राच्या राजदूत डेबोरा लायन्स यांनी असेही म्हटले आहे की तालिबान अफगाणिस्तानातील यूएन कर्मचाऱ्यांना त्रास देत आहे आणि त्यांना धमकावत आहे. जर कर्मचाऱ्यांना त्यांच्या जीवाची भीती वाटत असेल तर ते अफगाणिस्तानच्या लोकांसाठी अत्यावश्यक काम करू शकणार नाहीत.

माजी उपराष्ट्रपतींच्या घरात 150 तालिबानी राहतात
तालिबानने काबुलमधील अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अब्दुल रशीद दोस्तम यांच्या राजवाड्यावर कब्जा केला आहे. 150 तालिबान सर्व सुविधांसह येथे राहत आहेत. ते म्हणतात की दोस्तम हा एक पिशाच होता ज्याने अफगाण लोकांच्या रक्ताने हे घर बांधले होते. अफगाणिस्तानच्या लोकांना खाण्यासाठी काहीच नव्हते आणि दोस्तमने एक राजवाडा बांधला.

बातम्या आणखी आहेत...