आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालिबानी राजवट:तालिबानकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या, अफगाणिस्तानच्या महिला बॉक्सरला सोडावा लागला देश

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानात तालिबानने ताबा मिळवल्यानंतर अनेक वेदनादायक कथा समोर येत आहेत. आता अफगाणिस्तानची महिला बॉक्सर सीमा रेझाईचे प्रकरण समोर आले आहे, ज्यांना आपले पॅशल फॉलो करण्यासाठी देश सोडून जावे लागले. ती अफगाणिस्तानमध्ये लाइटवेट बॉक्सिंग चॅम्पियन राहिली आहे.

तालिबानने तिला अफगाणिस्तान सोडण्याची किंवा मरण्याच्या तयारीत राहा, अशी धमकी दिली होती. स्पुतनिकला दिलेल्या मुलाखतीत सीमाने सांगितले की, तालिबानकडून धमक्या मिळाल्यानंतर कुटुंबानेही तिला पाठिंबा देणे बंद केले होते. प्रत्येकजण घाबरला होता, म्हणून तिने देश सोडण्याचा निर्णय घेतला.

तालिबानने काबूल काबीज केले तेव्हा सीमा एका प्रशिक्षकासोबत बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत होती. पुरुष प्रशिक्षक महिला खेळाडूला प्रशिक्षण देत होता, त्यामुळे तालिबानने तिच्या घरी धमकीची पत्रे पाठवायला सुरुवात केली. पत्रात त्यांनी लिहिले की, जर तुम्हाला अफगाणिस्तानात राहायचे असेल तर तुम्हाला बॉक्सिंग सोडावे लागेल किंवा मरावे लागेल.

सीमाने सांगितले की ती विमानात चढली आणि कतारला गेली. आता वाट पाहत आहे की अमेरिका तिला व्हिसा देऊन आपल्याकडे बोलावून घेईल. ती वयाच्या 16 व्या वर्षापासून बॉक्सिंग करत आहे.

बातम्या आणखी आहेत...