आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात तालिबानने दोन्ही देशांना शांततेचे आवाहन केले आहे. तालिबानने म्हटले की, दोघांनी बसून सर्व प्रश्न सोडवावेत. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, युद्धात सामील असलेल्या देशांनी हिंसाचाराला आणखी चिथावणी देणारे कोणतेही पाऊल उचलू नये. युद्धात अडकलेल्या नागरिकांची आम्हाला चिंता आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल कहर बल्खी यांनी सांगितले की, तालिबान या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. ते पुढे म्हणाले की, तालिबान या युद्धात कोणाचीही बाजू घेत नाहीये. आम्ही युक्रेनमध्ये राहणाऱ्या आमच्या देशातील लोकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या मायदेशी परतण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. परिस्थिती सुधारताच त्यांना परत आणले जाईल.
सोशल मीडियावर यूजर्स ट्रोल करत आहेत
तालिबानच्या वक्तव्यावर सोशल मीडिया यूजर्स सरकारला जोरदार ट्रोल करत आहेत. कॉर्नेलिस या युजरने ट्विट केले की, 'तालिबान रशिया आणि युक्रेनला शांततेचे आवाहन करत आहेत. असे वाटतेय की, शेवटची घटका जवळ आली आहे' आणखी एका युजर अर्श याकिनने ट्विट केले की, 'तालिबानचे शीर्ष नेतृत्व कॉमेडियन पदासाठी अर्ज करणार आहे का?'
अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा रक्तरंजित इतिहास आहे
तालिबान ही एक दहशतवादी संघटना आहे, जी हिंसाचाराच्या माध्यमातून अफगाणिस्तानात सत्तेवर आहे. ब्राउन युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार, 2001 पासून, तालिबानने 45,000 हून अधिक अफगाण सैनिक आणि सुमारे 1.11 लाख नागरिकांची सत्ता मिळवण्यासाठी त्यांची हत्या केली आहे.
पाकिस्तानने दिला आहे रशियाला पाठिंबा
तालिबान युद्धात तटस्थ राहण्याची भाषा करत असताना पाकिस्तानने उघडपणे रशियाला पाठिंबा दिला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान मॉस्को दौऱ्यावर आहेत. रशियाला पाठिंबा देण्यासाठी खान पुतीन यांना भेटण्यासाठी तेथे गेले आहेत.
135 हून अधिक मृत्यू, राष्ट्राध्यक्ष म्हणाले- मलाही मारणार
युक्रेनमध्ये रशियन हल्ल्यात 135 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर जेलेंस्की यांनी व्हिडिओ जारी केला आहे. शत्रू देश माझी आणि माझ्या कुटुंबाची हत्या करतील, असे जेलेंस्की यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी जगाकडून मदत मागितली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.