आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Taliban Bans Women From Going To Restaurant park With Family, Restaurant Will Be Closed If Fatwa Is Violated

निर्बंध:तालिबानची महिलांना कुटुंबासह रेस्तराँ-पार्कला जाण्यास मनाई, फतव्याचे उल्लंघन केल्यास रेस्तराँ बंद करणार

काबूल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालिबानने अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात महिलांना कुटुंबासह रेस्तराँ किंवा उद्यानात जाण्यावरही निर्बंध घातले आहेत. या फतव्याचे उल्लंघन करणाऱ्यांचे रेस्तराँ बंद केले जातील, असा इशाराही तालिबानने दिला आहे.

सार्वजनिक ठिकाणी महिला-पुरुषांना परस्परांना भेटण्याची संधी मिळते. ही गोष्टी इस्लामसाठी योग्य नाही, अशी तक्रार धर्मगुरूंनी केली होती. त्यानंतर तालिबानने हा निर्णय घेतला. हेरात राज्याचे सदाचारविषयक मंत्रालयाचे अधिकारी बैज मोहंमद नजीर म्हणाले, माध्यमांतील बातम्या चुकीच्या आहेत. हिरवळ असलेल्या रेस्तराँमध्ये जाण्यास मनाई आहे. कारण अशा ठिकाणी स्त्री-पुरुष भेटतात. हा निर्णय धर्मगुरू तसेच सामान्य नागरिकांच्या तक्रारीनंतर घेतला गेला. यापूर्वी तालिबानने सहाव्या वर्गातील मुलींच्या शालेय शिक्षणावर बंदी घातली आहे.