आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Taliban Capture Afghanistan Kabul LIVE Update; President Ashraf Ghani | Kabul Hamid Karzai International Airport | Taliban News Latest

तालिबानी राज्य:हिजाब न घातलेल्या महिलांवर तालिबान्यांचा गोळीबार; गोळीबारात काही लोकांचा मृत्यू, तर अमेरिका-तालिबान पुन्हा समोरासमोर

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानात तालिबान्यांनी सत्ता मिळवल्यानंतर काबूल विमानतळावर मोठी गर्दी झाली आहे. सध्या विमानतळ अमेरिकन सैन्याच्या नियंत्रणाखाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळावर झालेल्या गोळीबारात काही लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक लोक जखमी झाले आहेत. एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये विमानतळावर मृतदेह दिसत आहेत.

हिजाब न घातलेल्या महिलांना तालिबानने घातल्या गोळ्या
काबूल विमानतळावरून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सूत्रांनी भास्करला सांगितले की, हिजाब न घातलेल्या अनेक महिलांना विमानतळाजवळ गोळ्या घालण्यात आल्या. मात्र, तालिबानने अद्याप याला दुजोरा दिलेला नाही.

गोळीबारानंतर विमानतळावर चेंगराचेंगरी झाली. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. सूत्रानुसार, तालिबानच्या गोळीबारानंतर अमेरिकन सैनिकांनीही प्रत्युत्तर दिले आहे.

घटनेला तालिबानचा दुजोरा नाही

तालिबानच्या एका सूत्राने दैनिक भास्करला सांगितले- सर्व काही अतिशय वेगाने घडले. तालिबान अनेक भागात आपले लढाऊ सैनिक तैनात करू शकलेले नाहीत. शहराच्या अनेक भागातून लूट झाल्याचे वृत्त आहे, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. विमानतळाची सुरक्षा तालिबानच्या हातात नाही. तेथे काय घडले याचा आम्ही दुजोरा देऊ शत नाही.

अमेरिका विमानतळावर तैनात करणार 6 हजार सैनिक
दरन्यान, अमेरिकेने म्हटले आहे की ते आपल्या 6,000 सैनिकांना विमानतळावर तैनात करेल, जेणेकरून नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढता येईल. काबूल विमानतळावर सध्या चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती आहे. देश सोडण्यासाठी हजारो लोक तेथे जमले आहेत. असे बरेच लोक आहेत जे कोणतेही सामान न घेता विमानतळावर पोहोचले आहेत.

बातम्या आणखी आहेत...